आयुष मंत्रालय
समग्र आयुर्वेदासाठी संशोधनातील प्रगती आणि जागतिक संधी - आरोह -2024 या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचा उद्या दिल्लीत प्रारंभ
प्रविष्टि तिथि:
16 OCT 2024 9:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2024
नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने आयोजित केलेल्या समग्र आयुर्वेदासाठी संशोधनातील प्रगती आणि जागतिक संधी - आरोह -2024 या संस्थेच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचा उद्या गुरुवार 17 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत प्रारंभ होणार आहे. 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत चालणाऱ्या या प्रतिष्ठित कार्यक्रमात प्रत्यक्ष आणि आभासी माध्यमातून सामील व्हायची सहभागींना अनोखी संधी असेल. या वैश्विक कार्यक्रमाची संकल्पना "समग्र आयुर्वेदासाठी संशोधनातील प्रगती आणि जागतिक संधी" या विषयावर केंद्रित असेल.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉ. धनंजय यशवंत चंद्रचूड यांच्या हस्ते होणार आहे.
“आरोह -2024 ही आयुर्वेदाला जागतिक आरोग्य आणि तंदुरुस्तीचे प्रमुख स्तंभ म्हणून स्थान देण्याच्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या दृष्टीकोनाशी सुसंगत असेल. या परिषदेत आधुनिक वैज्ञानिक प्रगतीसह पारंपरिक आयुर्वेदिक ज्ञानाची सांगड कशी घालता येईल याचा धांडोळा घेण्यासाठी जपान, कोलंबिया, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, श्रीलंका आणि अर्जेंटिना येथील विद्वत्जन, उद्योग धुरीण आणि आयुर्वेद तज्ञ एकत्र येतील.
परिषदेच्या कार्यसूचीत आयुर्वेद, एथनो-औषध, गुणवत्ता नियंत्रण, मानकीकरण, निदान, औषध वितरण, पुराव्यावर आधारित समज आणि जागतिकीकरण यासह विविध विषयांचा समावेश आहे. अनुभवी तज्ज्ञ आयुर्वेदिक पद्धतींवर व्यावहारिक आणि सैद्धांतिक ज्ञान सामायिक करतील.
या परिषदेत तीन दिवसीय कार्यशाळा आणि 16 वैज्ञानिक सत्रे आहेत, ज्यामध्ये 400 हून अधिक शोधनिबंध सादर केले जाणार आहेत.
S.Patil/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2065616)
आगंतुक पटल : 101