संरक्षण मंत्रालय
लष्कर जनरल उपेन्द्र द्विवेदी, जपानच्या दौऱ्यासाठी रवाना
Posted On:
14 OCT 2024 2:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2024
लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, 14 ते 17 ऑक्टोबर 2024 या कालावधीत जपानच्या दौऱ्यासाठी रवाना होत आहेत.
भारत आणि जपानमधील संरक्षण सहकार्याला अधिक सामर्थ्यशाली करण्यासाठी उचललेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
14 ऑक्टोबर 2024 रोजी जनरल उपेंद्र द्विवेदी जपानमधील टोकियो येथील भारतीय दूतावासात राजदूत श्री सिबी जॉर्ज यांची भेट घेतील आणि त्यानंतर भारतीय दूतावासात आयोजित भारत-जपान संबंध याविषयावरील चर्चेत सहभागी होतील.
15 ऑक्टोबर 2024 रोजी लष्कर प्रमुख जपानच्या वरिष्ठ लष्करी नेतृत्वाशी इचिगाया यांच्या जपानच्या संरक्षण मंत्रालयात (MoD) जाऊन त्यांच्याशी संवाद साधतील. यावेळी चीफ ऑफ स्टाफ जनरल योशिदा योशिहिदे, तसेच संयुक्त स्वसंरक्षण दलाचे प्रमुख(JGSDF); जनरल मोरिशिता यासुनोरी,तंत्रज्ञान आणि लॉजिस्टिक एजन्सी अधिग्रहण आयुक्त (एटीएलए) श्री इशिकावा ताकेशी,यांच्यासोबत त्यांच्या बैठकांचे नियोजन केले आहे; भारत आणि जपान यांच्यातील लष्करी सहकार्य अधिक मजबूत करणे हा या चर्चेचा उद्देश असेल.जनरल उपेंद्र द्विवेदी हे इचिगया येथील स्मारक इथे श्रद्धांजली अर्पण करतील आणि त्यावेळी त्यांना जेजीएसडीएफच्या वतीने सन्मान मानवंदना देण्यात येईल. या भेटीदरम्यान JGSDF च्या अधिकाऱ्यांच्या वरिष्ठतेनुसार त्यांच्याशी संवाद चर्चासत्र आणि राष्ट्रीय संरक्षण अभ्यास संस्थेला भेट देखील समाविष्ट आहे.
16 ऑक्टोबर 2024 रोजी लष्कर पटामुख उपेंद्र द्विवेदी,जपान ग्राउंड सेल्फ डिफेन्स फोर्सचे जनरल मोरिशिता यासुनोरी, यांच्यासोबत फुजी शाळेस भेट देतील, जिथे ते फुजीचे कमांडिंग जनरल लेफ्टनंट जनरल कोडामा यासुयुकी यांच्याशी संभाषण करतील. त्यावेळी द्विवेदी यांच्यासमोर एक विशेष सादरीकरण करण्यात येईल आणि त्यानंतर ते उपकरणे आणि सुविधा यावरील प्रदर्शनाला भेट देखील देणार आहेत.
17 ऑक्टोबर 2024 रोजी लष्कर प्रमुख हिरोशिमाला भेट देतील, जिथे ते हिरोशिमा पीस पार्क येथील शांती स्थळावर पुष्पचक्र अर्पण करतील आणि पीस पार्क येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील.
जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या या दौऱ्याचा उद्देश भारत आणि जपानच्या लष्करांमधील लष्करी सहकार्य मजबूत करणे आणि दोन्ही राष्ट्रांमधील सहकार्याचे आधुनिक मार्गांचे अन्वेषण करणे हा आहे.
Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2064642)
Visitor Counter : 51