संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आत्मनिर्भरतेसाठी स्वदेशी संरक्षण नवोन्मेष : संरक्षणमंत्री करणार डिफकनेक्ट 4.0 चे उद्घाटन

Posted On: 06 OCT 2024 5:12PM by PIB Mumbai

 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह 07 ऑक्टोबर 2024 रोजी दिल्ली कॅन्टॉनमेंटमधील माणेकशॉ सेंटर येथे डिफकनेक्ट 4.0(DefConnect 4.0) चे उद्घाटन करतील. स्वदेशी नवोन्मेषाला चालना देण्यासाठी आणि देशाच्या वाढत्या संरक्षण परिसंस्थेचे महत्त्व दाखवून देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागाच्या अंतर्गत इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सलन्स - डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायझेशन (iDEX-DIO) द्वारे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

सशस्त्र दले, सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उपक्रम (DPSU), उद्योग धुरीण, नवोन्मेषकर्ते, स्टार्ट-अप आणि एमएसएमई, शैक्षणिक संस्था, इनक्यूबेटर, गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते यांना एकत्र आणणारा डिफकनेक्ट 4.0  भारताच्या संरक्षण नवोन्मेषाच्या वाटचालीतला एक महत्त्वाचा टप्पा बनला आहे.

या कार्यक्रमात अतिशय प्रभावी तंत्रज्ञानाचे दर्शन घडवण्यात येईल जो आयडेक्स नवोन्मेषकर्त्यांना त्यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रगत क्षमता आणि परिवर्तनकारी उत्पादनांचे प्रदर्शन करण्याची वैशिष्ट्यपूर्ण संधी उपलब्ध करून देत आहे.

विविध हितधारकांचा समावेश असलेल्या अभ्यागतवर्गाला आकर्षित करण्याच्या, त्यांच्यात सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या आणि अतिशय शक्तिशाली सहकार्याला बळकटी देण्यावर भर  असलेल्या नवोन्मेषाला चालना देऊ शकेल, अशा प्रकारच्या चर्चा आणि संवाद घडवून आणण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाची रचना करण्यात आली आहे.

डिफकनेक्ट 4.0 मध्ये संरक्षण उद्योगातील धुरीण आणि दिग्गजांसोबत प्रत्यक्ष संवाद आणि त्यांचे मार्गदर्शन यासोबतच  संरक्षणमंत्र्याकडून अनेक उपक्रमांचा शुभारंभ आणि घोषणा करण्यात येईल. 

अलीकडेच अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा, संरक्षण नवोन्मेषी परिसंस्थेसाठी महत्त्वाचे उपाय आणि सेमीकंडक्टर क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रमांवर भर देणारी विषय आधारित सत्रे यांचा समावेश या कार्यक्रमात असेल.

आत्तापर्यंत, आयडेक्सने डिफेन्स इंडिया स्टार्ट-अप चॅलेंजेसच्या 11 आवृत्त्या  केल्या आहेत.  सध्या हा उपक्रम 450 हून अधिक स्टार्ट-अप/एमएसएमईसोबत महत्त्वाच्या प्रकल्पांवर सहकार्य करत आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये आयडेक्स उपक्रमाचा प्रारंभ केला. हा उपक्रम संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील विविध भागधारकांसाठी एक एकीकृत व्यासपीठ प्रदान करत , 2047 पर्यंत विकसित भारताच्या संकल्पपूर्तीच्या प्रयत्नांमध्ये योगदान देत आहे.

***

S.Kakade/S.Patil/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2062661) Visitor Counter : 62


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil