सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

'गांधी जयंती'च्या दिवशी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील ‘खादी भवन’ने नोंदवला विक्रीचा नवा उच्चांक ; नागरिकांनी 2 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या खादी उत्पादनांची केली खरेदी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'च्या 114 व्या भागात 'व्होकल फॉर लोकल' आणि 'मेड इन इंडिया' उत्पादने खरेदी करण्याचे केले होते आवाहन

Posted On: 04 OCT 2024 5:54PM by PIB Mumbai

 

'न्यू इंडियाज न्यू खादी' चे प्रणेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, दिल्लीतील नागरिकांनी खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांच्या खरेदीचा नवा उच्चांक नोंदवला आहे.

2 ऑक्टोबर रोजी 'गांधी जयंती'च्या दिवशी, रिगल बिल्डिंग, कॅनॉट प्लेस, नवी दिल्ली येथील ‘खादी भवन’ ने एका दिवसात प्रथमच, खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांची सर्वाधिक, म्हणजेच 2 कोटी 1 लाख 37 हजार रुपयांची विक्री केली. खादी आणि ग्रामोद्योगाच्या इतिहासात, देशातील एखाद्या खादी भवनाने नोंदवलेला हा सर्वोच्च विक्रम आहे.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालया अंतर्गत, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (केव्हीआयसी) अध्यक्ष मनोज कुमार यांनी, गांधी जयंतीनिमित्त बापूजींचा वारसा असलेल्या खादी उत्पादनांच्या अभूतपूर्व विक्रीचे श्रेय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'ब्रँड पॉवर'ला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षांमध्ये विकसित झालेल्या 'चरखा क्रांती'ला दिले आहे.

केव्हीआयसीच्या अध्यक्षांनी नमूद केले की, 29 सप्टेंबर 2024 रोजी 'मन की बात' कार्यक्रमाच्या 114 व्या भागात, पंतप्रधानांनी देशवासियांना सणासुदीच्या काळात 'मेड इन इंडिया' आणि 'वोकल फॉर लोकल' अंतर्गत स्थानिक उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन केले होते. त्याचा लोकांवर मोठा प्रभाव पडला. त्यांच्या आवाहनाचे फलित म्हणजे, गेल्या काही वर्षांत दरवर्षी गांधी जयंतीला खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांच्या विक्रीचा नवा विक्रम नोंदवला जात आहे, ज्यामधून हेच दिसून येते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भरभराटीला आलेली 'चरखा क्रांती', आता 'विकसित भारताची हमी' बनली आहे.

विक्रीच्या ताज्या आकडेवारीनुसार, गांधी जयंतीनिमित्त दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील खादी भवन येथे 2.01 कोटी रुपयांची खादी आणि ग्रामोद्योग उत्पादने विकली गेली. यामध्ये 67.32 लाख रुपयांची कॉटन खादी, 44.75 लाख रुपयांची सिल्क खादी, 7.61 लाख रुपयांची लोकरी खादी, 1.87 लाख रुपयांची पॉली खादी, 65.09 लाख रुपयांची तयार खादी वस्त्रे, 12.29 लाख रुपयांची ग्रामोद्योग उत्पादने आणि 2.44 लाख रुपयांची हस्तकला उत्पादने, याचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कॉटन खादीची सर्वाधिक विक्री झाली.

परिशिष्ट-(अ)

‘खादी ग्रामोद्योग भवन’, कॅनॉट प्लेस, दिल्ली येथील गेल्या काही वर्षांमधील विक्रीची आकडेवारी:

 

वर्ष

2021

2022

2023

2024

विक्री

रु. 1.01 कोटी

रु. 1.34 कोटी

रु. 1.52 कोटी

रु. 2.01 कोटी

 

 

29 सप्टेंबर 2024 रोजी 'मन की बात' कार्यक्रमाचा 114 वा भाग प्रसारित झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारतीय नागरिकांना आवाहन

“मित्रहो, या सणासुदीच्या दिवसांमध्ये तुम्ही पुन्हा एकदा आपला जुना निश्चय पुन्हा एकदा पूर्ण करू शकता. तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी कराल, ती ‘मेड इन इंडिया’ असायला हवी… तुम्ही जी काही भेट द्याल, ती सुद्धा मेड इन इंडिया असावी. केवळ मातीचे दिवे विकत घेणे म्हणजे ‘व्होकल फॉर लोकल’ नव्हे. तुम्ही तुमच्या परिसरात बनवलेल्या स्थानिक उत्पादनांचा जास्तीतजास्त प्रचार करायला हवा. असे कोणतेही उत्पादन, जे भारतीय कारागिराच्या परिश्रमांतून बनले गेले आहे, जे भारतीय भूमीवर तयार झाले आहे, तो आपला अभिमान आहे. या अभिमानाचा आपण नेहमीच गौरव करायला हवा.”

- पंतप्रधान नरेंद्र मोदी.

***

N.Chitale/R.agashe/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2062171) Visitor Counter : 24


Read this release in: English , Urdu , Hindi