आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेला आंतरराष्ट्रीय वैद्यकीय उपकरण नियामक मंचाच्या संलग्न सदस्यत्वाची मिळाली मान्यता

Posted On: 03 OCT 2024 2:26PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 ऑक्‍टोबर 2024

 

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जागतिक स्तरावर स्वीकारल्या गेलेल्या मानकांसह देशाच्या नियामकांना संरेखित करणारे सर्वसमावेशक नियम वैद्यकीय उपकरणांसाठी लागू केले आहेत.

वैद्यकीय उपकरण नियामक प्रणालीमध्ये जागतिक संरेखन साध्य करण्यासाठी, देशांतर्गत उद्योगाची स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व वाढवण्यासाठी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत, येणाऱ्या औषध मानक नियंत्रण संस्थेने (सीडीएससीओ), आंतरराष्ट्रीय वैद्यकीय उपकरणे नियामक मंचाच्या (आयएमडीआरएफ) संलग्न सदस्यत्वासाठी अर्ज केला होता. आंतरराष्ट्रीय वैद्यकीय उपकरणे नियामक मंचाच्या संलग्न सदस्यत्वासाठी भारताने केलेल्या  अर्जाचा आढावा घेतल्यानंतर आणि सीडीएससीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सिएटल, वॉशिंग्टन, अमेरिका येथे सप्टेंबर 2024 मध्ये आयोजित केलेल्या आयएमडीआरएफ च्या 26 व्या सत्राच्या दरम्यान झालेल्या चर्चेनंतर, सीडीएससीओ ला आयएमडीआरएफ कडून मंचाचा संलग्न सदस्य म्हणून मान्यता मिळाली आहे.

हे सदस्यत्व जगभरातील वैद्यकीय उपकरणांच्या  आवश्यकतांमध्ये सुसूत्रता आणण्यास मदत करते, ज्यामुळे उत्पादकांना निर्मिती करताना कमी त्रास होतो तसेच यामुळे एकमेकांतील सहकार्य वाढून, नियमांमध्ये सुसंवाद साधत आणि अभिसरणाचा प्रचार करून सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यात मदत होते.हे नवकल्पना आणि नवीन वैद्यकीय उपकरणांचा वेळेवर वापर  करण्यास देखील मदत करते.

हे सीडीएससीओची वैद्यकीय उपकरण नियामक प्रणाली मजबूत करेल, वाढत्या वैविध्यपूर्ण उदयोन्मुख तांत्रिक आव्हानांना तोंड देण्यास मदत करेल, सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षितता  सुनिश्चित करेल आणि  वैद्यकीय उपकरण नियमनासाठी आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त करण्याचे आपले ध्येय कायम ठेवेल.

 

* * *

S.Kane/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2061481) Visitor Counter : 20


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu