संरक्षण मंत्रालय
भारत-जर्मनी लष्करी सहकार्य उपसमूहाच्या 17 व्या बैठकीचे बर्लिन येथे आयोजन
Posted On:
02 OCT 2024 7:08PM by PIB Mumbai
भारत-जर्मनी लष्करी सहकार्य उपसमूहाच्या (एमसीएसजी) 17 व्या बैठकीचे 01आणि 02 ऑक्टोबर 24 दरम्यान जर्मनीतील बर्लिन येथे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये द्विपक्षीय लष्करी सहकार्याची व्याप्ती आणखी वाढवण्यासाठी आणि संपूर्ण ‘ स्पेक्ट्रम’मध्ये सुरू असलेली संरक्षण प्रतिबद्धता मजबूत करण्यासाठी नवीन उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. ही बैठक मैत्रीपूर्ण, सौहार्दाच्या वातावरणामध्ये उत्साहात पार पडली.
एमसीएसजी या मंचाची स्थापना विशिष्ट कारणांसाठी केली आहे. दोन्ही देशांच्या मुख्यालयांमध्ये , एकीकृत संरक्षण कर्मचारी आणि जर्मनीच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य सशस्त्र सेना विभाग यांच्यात धोरणात्मक आणि रणनीतीच्या स्तरावर नियमित चर्चा केली जावी आणि दोन्ही राष्ट्रांमधील संरक्षण सहकार्याला चालना देण्यासाठी स्थापन करण्यात आलेला हा एक मंच आहे. या बैठकीचे सह-अध्यक्ष म्हणून भारताच्या वतीने आंतरराष्ट्रीय संरक्षण सहकार्यासाठी एकात्मिक संरक्षण कर्मचाऱ्यांचे उप-सहायक प्रमुख सहभागी झाले तर जर्मनीच्या बाजूने आंतरराष्ट्रीय सहकार्य विभागाचे सशस्त्र सेना कार्यालयाच्या उपसंचालकांनी चर्चा केली.
***
S.Patil/S.Bedekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2061290)
Visitor Counter : 37