सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अभिलेखांमधून प्रशासनाचे वास्तव आणि दिशेचा बोध होतो: केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत

Posted On: 01 OCT 2024 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 ऑक्‍टोबर 2024

 

केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी आज नवी दिल्ली मध्ये, जनपथ, येथील भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार येथे आयोजित "सुशासन और अभिलेख" (सुशासन आणि नोंदी) या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. त्यांनी या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेल्या नोंदींचेही निरीक्षण केले आणि त्यानंतर आयोजित बैठकीत नोंदींच्या संवर्धन प्रणालीचा आढावा घेतला. यावेळी केंद्रीय मंत्री शेखावत म्हणाले की, अभिलेखांमुळे आपल्याला प्रशासनाची स्थिती व दिशेच्या वास्तवाची जाणीव होते. या प्रदर्शनात भारत सरकारची विविध मंत्रालये आणि विभागांनी नुकतेच प्राप्त केलेले ऐतिहासिक दस्त ऐवज मांडण्यात आले आहेत.

गेल्या दशकभरात, भारत सरकारच्या स्वच्छता मोहिमेमुळे केवक सार्वजनिक आरोग्यात सुधारणा झाली नसून, देशाच्या ऐतिहासिक संग्रहांच्या जतनालाही प्रोत्साहन मिळाले. विविध मंत्रालये, विभाग आणि इतर सरकारी संस्थांमधील जुन्या नोंदींचे पुनरावलोकन, निपटारा  आणि मूल्यमापन, हा या मोहिमेचा महत्वाचा पैलू असून, ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या नोंदी भारतीय राष्ट्रीय अभिलेखागाराकडे (NAI) हस्तांतरित करणे, हे याचे उद्दिष्ट आहे.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत, 2021 ते 2024 या काळात, 11 मंत्रालये आणि विभागांकडून मूल्यांकन झाल्यावर, ऐतिहासिक महत्वाच्या अंदाजे 74,000 फाईल्स राष्ट्रीय अभिलेखागाराकडे हस्तांतरित करण्यात आल्या. या प्रदर्शनाच्या माध्यमातून, राष्ट्रीय अभिलेखागाराने नव्याने मिळवलेल्या या दस्तऐवजांची एक झलक प्रदर्शित केली असून, यामधून भारतातील प्रशासनात झालेला अमुलाग्र बदल दिसून येतो.

प्रदर्शनात भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार आणि विविध मंत्रालये आणि विभाग यांच्यात, चिरस्थायी ऐतिहासिक महत्वाच्या नोंदी जतन करण्यात असलेल्या सहयोगावर भर देण्यात आला असून, यामध्ये समाजाची सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती करणारी स्वच्छता आणि प्रशासनाची तत्त्वे अधोरेखित करण्यात आली आहेत.

   

प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना विशेष मोहिमेमधून मिळालेल्या अमूल्य ऐतिहासिक दस्त ऐवजांची झलक पाहायला मिळाली. या ठिकाणी राष्ट्रपतींच्या सचिवालयाच्या कामकाजापासून ते जलसंपदा  व्यवस्थापनातील प्रगतीपर्यंतचे, पुढील ठळक मुद्दे प्रदर्शित करण्यात आले आहेत:

राष्ट्रपती सचिवालय: राष्ट्रपती भवनाचे पहिले हवाई छायाचित्रण आणि भारताचे पहिले फील्ड मार्शल म्हणून जनरल सॅम माणेकशॉ यांची पदोन्नती, याबाबतचे दस्त ऐवज.

भारतीय निवडणूक आयोग: प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना मतपेटीपासून, ते 1982 मध्ये केरळ विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच सादर करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या (EVM) अंमलबजावणीपर्यंतचा प्रवास अनुभवता आला.

रेल्वे मंत्रालय: भारतामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर श्रीलंका आणि म्यानमार यासारख्या देशांमध्ये रेल्वे नेटवर्कचा विस्तार करण्यामधील भारतीय रेल्वेची भूमिका, याबाबतचे दस्त ऐवज.  

ऊर्जा मंत्रालय: उत्तराखंडमधील टिहरी धरण आणि कोटेश्वर धरण यासारख्या मोठ्या उर्जा प्रकल्पांशी संबंधित महत्त्वाच्या नोंदी.

संसदीय कामकाज मंत्रालय: घटनादुरुस्ती विधेयके आणि लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या उपसभापतींची निवड यासारख्या महत्त्वाच्या कायदेविषयक घडामोडींवरील नोंदी प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय: बोफोर्स समिती आणि राष्ट्रीय नूतनीकरण निधी (NRF) बाबत कागदपत्रांसह भारताच्या व्यापार आणि औद्योगिक विकासाशी संबंधित महत्वाच्या नोंदी.

पत्र सूचना कार्यालय: जनरल जयंतो नाथ चौधरी आणि एअर मार्शल अर्जन सिंह  यांना प्रदान करण्यात आलेला पद्मविभूषण पुरस्कार तसेच कलकत्ता रेडिओवरील सरदार वल्लभभाई पटेल यांचे 1950 मधील भाषण यांसारख्या महत्त्वाच्या घटना  प्रदर्शनात मांडल्या होत्या.

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2060941) Visitor Counter : 39


Read this release in: English , Urdu , Hindi