कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्लीतील कृषी भवन येथे कृषी आणि कृषक कल्याण विभागाने आयोजित केले सफाई मित्रांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

प्रविष्टि तिथि: 28 SEP 2024 7:45PM by PIB Mumbai

 

कृषी आणि कृषक कल्याण विभागाअंतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत 'स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता' या संकल्पनेवर आधारित 'स्वच्छता ही सेवा-, 2024 ' या मोहिमेत विभागाच्या देशभरातील अधीनस्थ/संलग्न/स्वायत्तसंस्था/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम/क्षेत्रीय कार्यालये सहभागी झाली आहेत. या उपक्रमांचा एक भाग म्हणून, "सफाई मित्र सुरक्षा शिवार" या संकल्पनेनुसार कृषी आणि कृषक कल्याण विभागाने राष्ट्रीय बीज महामंडळ मर्यादितच्या सहकार्याने आज नवी दिल्लीतील कृषी भवनात सफाई मित्रांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते.

सफाई मित्र हे परिसंस्थेचा अविभाज्य भाग आहेत आणि ते काम करण्यासाठी निरोगी आणि स्वच्छ वातावरण तयार करतात. याविषयीची अधिक व्यापक कल्याणकारी भूमिका लक्षात घेऊन कृषी आणि कृषक कल्याण विभागाने सफाई मित्रांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले. आरोग्य तपासणी शिबिरात 150 पेक्षा जास्त सफाई मित्रांनी सहभाग घेतला. या शिबिरात आरोग्याची काळजी घेण्याबाबतचे महत्त्वपूर्ण सल्ले त्यांना देण्यात आले.

संपूर्ण रक्त गणना (सीबीसी), यकृत कार्य चाचणी (एलएफटी), मूत्रपिंड कार्य चाचणी (केएफटी), लिपिड प्रोफाइल चाचण्या, थायरॉईड प्रोफाइल चाचण्या, रँडम ब्लड शुगर टेस्ट अशा आरोग्य तपासण्याही यावेळी करण्यात आल्या.

कृषी भवनातील सर्व सफाई मित्र या शिबिरात उत्साहाने सहभागी झाले.

***

M.Pange/P.Jambhekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2060017) आगंतुक पटल : 56
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी