आयुष मंत्रालय
आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी आयुष मंत्रालयाची केली पाहणी केली आणि ‘स्वच्छता ही सेवा 2024’ मोहिमेचा एक भाग म्हणून स्वच्छता उपक्रमांमध्ये घेतला सहभाग
Posted On:
28 SEP 2024 7:30PM by PIB Mumbai
केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी 27 सप्टेंबर रोजी, सध्या सुरू असलेल्या ‘स्वच्छता ही सेवा 2024’ मोहिमेचा एक भाग म्हणून मंत्रालयाच्या परिसराची पाहणी केली तसेच विविध स्वच्छता उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. हा उपक्रम स्वच्छता आणि स्वाथ्यासाठी मंत्रालयाच्या वचनबद्धतेला बळकटी देतो. स्वच्छता आणि स्वाथ्य हे सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेचे प्रमुख प्राधान्य क्षेत्र आहे.
“स्वच्छता ही सेवा मोहिमेत मंत्रालयाच्या स्वच्छता उपक्रमात वैयक्तिकरित्या सहभागी होणे हा माझ्यासाठी विनम्र आणि लाभदायक अनुभव होता, असे प्रतापराव जाधव यावेळी म्हणाले. खरे नेतृत्व म्हणजे उदाहरण स्थापित करून त्याद्वारे नेतृत्व करणे, हा विश्वास या सहभागामुळे आणखी दृढ झाला, असे ते म्हणाले. ‘स्वच्छता ही सेवा’ ही केवळ मोहीम नसून एक सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येक छोटासा प्रयत्न महत्त्वाचा असून आपण एकत्रित येऊन स्वच्छ, निरोगी भारत घडवू शकतो”, असे त्यांनी अधोरेखित केले.
राष्ट्रीय मोहिमेच्या अनुषंगाने आयुष मंत्रालयाने व्यापक सार्वजनिक सहभाग सुनिश्चित करून एकूण 545 कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मोहिमेतील आतापर्यंतच्या ठळक घडामोडींमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:
स्वच्छता में जन भागीदारी : 255 कार्यक्रमांमध्ये सामान्य नागरिकांचा सक्रिय सहभाग.
सीटीयु (स्वच्छता आणि साफसफाईसाठी निश्चित केंद्रे): विविध भागात स्वच्छता राखण्यासाठी एकूण 102 युनिट्सचे आयोजन करण्यात आले.
सफाई मित्र शिबिर (स्वच्छता कामगार शिबिरे): सफाई मित्रांच्या (स्वच्छता कामगारांच्या) प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी आणि मान्यता देण्यासाठी 188 शिबिरे यशस्वीरित्या आयोजित केली जात आहेत.
स्वच्छता ही सेवा मोहिमेव्यतिरिक्त, आयुष मंत्रालय विशेष मोहीम 4.0 मध्ये देखील सक्रिय योगदान देत आहे. तसेच मंत्रालयातील स्वच्छता आणि एकूण कार्यक्षमता सुधारण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांवर लक्ष केंद्रित करत आहे. 27 सप्टेंबर 2024 पर्यंत साध्य केलेल्या उद्दिष्टांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे:
1. स्वच्छता मोहीमा राबविण्यात आल्या : 50
2. सार्वजनिक तक्रारींचा निपटारा : 43
3. नोंदी व्यवस्थापन पूर्ण : 1,473
आजच्या कार्यक्रमांमध्ये आयुष राज्यमंत्र्यांचा सहभाग ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत सुव्यवस्थित कार्यक्रमांच्या मालिकेद्वारे स्वच्छता राखण्यासाठी आणि सार्वजनिक सहभाग वाढवण्यासाठी मंत्रालयाचे समर्पण अधोरेखित करतो.
आयुष मंत्रालय ‘स्वच्छ भारत मोहिमे’च्या व्यापक उद्दिष्टांमध्ये सहयोगी आणि सहभागात्मक उपायांद्वारे स्वच्छतेचे प्रयत्न टिकवून ठेवण्यासाठी वचनबद्ध आहे.
***
M.Pange/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2059998)
Visitor Counter : 35