खाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

2024-25 या आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत खनिज आणि बिगर लोहयुक्त धातू उत्पादनात मोठी वाढ


प्रमुख खनिजे आणि बिगर लोहयुक्त धातूंच्या उत्पादनात मजबूत वाढ

Posted On: 28 SEP 2024 2:28PM by PIB Mumbai

 

2023-24 या आर्थिक वर्षामध्ये उत्पादनाची विक्रमी पातळी गाठल्यानंतर, देशातील काही प्रमुख खनिजांच्या उत्पादनात 2024-25 (एप्रिल-ऑगस्ट) या आर्थिक वर्षात मोठी वाढ झाली आहे. मूल्यानुसार एकूण एमसीडीआर (मिनरल कॉन्झर्वेशन अँड डेव्हलपमेंट रूल्स- खनिज संवर्धन आणि विकास नियम) खनिज उत्पादनात सुमारे 70% लोह धातूचा वाटा आहे. 2023-24 मध्ये लोह खनिजाचे उत्पादन 274 दशलक्ष मेट्रिक टन होते. तात्पुरत्या आकडेवारीनुसार, लोहखनिजाचे उत्पादन 2023-24 (एप्रिल-ऑगस्ट) मध्ये 108 दशलक्ष मेट्रिक टन होते, 2024-25 (एप्रिल-ऑगस्ट) मध्ये ते 116 दशलक्ष मेट्रिक टनापर्यंत वाढले आहे. ही 7.4 टक्क्याची ठोस वाढ आहे. 2024-25 (एप्रिल-ऑगस्ट) मध्ये मँगनीज धातूचे उत्पादन 1.3 दशलक्ष मेट्रिक टनावरून 1.5 दशलक्ष मेट्रिक टन झाले आहे, अर्थात उत्पादनात 15.4% वाढ नोंदली गेली आहे.

बिगर लोहयुक्त (नॉन-फेरस) धातू क्षेत्रात 2024-25 (एप्रिल-ऑगस्ट) मध्ये प्राथमिक ॲल्युमिनियम उत्पादनात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 1.3% ची वाढ नोंदली गेली. 2023-24 (एप्रिल-ऑगस्ट) मध्ये 17.26 लाख टन असलेले उत्पादन 2024-25 (एप्रिल- ऑगस्ट) मध्ये 17.49 लाख टनापर्यंत वाढले. याच तुलनात्मक कालावधीत 1.91 लाख टन झालेले शुद्ध तांब्याचे उत्पादन 5.8 टक्के अर्थात 2.02 लाख टनापर्यंत वाढले.

भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ॲल्युमिनियम उत्पादक आणि चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा लोह उत्पादक देश असून, शुद्ध तांब्याच्या बाबतीत तो आघाडीच्या 10 उत्पादकांमध्ये समाविष्ट आहे. चालू आर्थिक वर्षात स्टील, ॲल्युमिनियम आणि तांबे या खनिजांच्या उत्पादनात सातत्याने वाढ झाली आहे, त्याचबरोबर ऊर्जा, पायाभूत सुविधा, बांधकाम, ऑटोमोटिव्ह आणि यंत्रसामग्री अशा क्षेत्रांमधे या खनिजांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 

***

M.Pange/P.Jambhekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2059841) Visitor Counter : 13


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi