संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह जयपूर येथील सैनिक विद्यालयाचे औपचारिकरित्या करणार उद्घाटन

प्रविष्टि तिथि: 22 SEP 2024 10:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 सप्‍टेंबर 2024

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 23 सप्टेंबर 2024 रोजी राजस्थानमधील जयपूरच्या सैनिक विद्यालयांचे औपचारिकरित्या उद्घाटन करतील. हे सरकारच्या 100 नवीन सैनिक विद्यालये स्थापित करण्याच्या दृष्टिकोनाचा भाग आहे, ज्यामध्ये अशासकीय संस्था, राज्य सरकारे आणि खाजगी विद्यालयांबरोबर भागीदारी करण्यात येईल. ही नवीन विद्यालये आधीच कार्यरत असलेल्या 33 सैनिक विद्यालयांव्यतिरिक्त असतील.

संरक्षण मंत्रालयाने भागीदारी मोड अंतर्गत 45 नवीन सैनिक विद्यालयांना मान्यता दिली आहे. ही नवीन विद्यालये, संबंधित शिक्षण मंडळांच्या संलग्नतेव्यतिरिक्त, सैनिक विद्यालय संस्थेच्या नेतृत्वाखाली काम करतील आणि नियम आणि नियमनांचे पालन करतील. त्यांच्या नियमित संलग्न बोर्ड अभ्यासक्रमाव्यतिरिक्त, ते सैनिक विद्यालय पद्धतीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक पीएलयुएस अभ्यासक्रमाचे शिक्षण देतील.

सप्टेंबर 2023 मध्ये, जयपूर येथे सैनिक विद्यालय संस्थेने भवानी निकेतन पब्लिक स्कूल या कार्यक्रमात नवीन सैनिक शाळेच्या स्थापनेसाठी भवानी निकेतन शिक्षा समितीसोबत करारावर स्वाक्षरी केली होती. या विद्यालयांचे कामकाज चालू शैक्षणिक वर्षात सुरू झाले आहे.

 

* * *

S.Patil/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2057681) आगंतुक पटल : 86
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी