संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भावी युद्धतंत्र हा तिन्ही सैन्यदलांसाठी पहिल्यांदाच आयोजित केलेला अभ्यासक्रम 23 सप्टेंबरपासून सुरू होणार

Posted On: 22 SEP 2024 9:43PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 सप्‍टेंबर 2024

 

एकात्मिक संरक्षण मुख्यालयाच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत 23 ते 27 सप्टेंबर 2024 या कालावधीत "भावी युद्धतंत्र" हा तिन्ही सैन्यदलांसाठी पहिल्यांदाच आयोजित केलेला अभ्यासक्रम पार पडेल. संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांचा हा एक अग्रगण्य उपक्रम असून, मेजर जनरल ते मेजर आणि इतर सेवांमधील त्यांच्या समकक्ष स्तरावरील अधिकाऱ्यांसाठी हा एक बहु-उपयोगी अभ्यासक्रम असेल. या अभ्यासक्रमात अधिकाऱ्यांना आधुनिक युद्धाच्या संचालन आणि तांत्रिक पैलूंची ओळख करून देण्याचा हेतू आहे.

हा अभ्यासक्रम भविष्यातील युद्धतंत्राशी संबंधित मुख्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करेल ज्यामुळे भविष्यातील युद्धे ही संपर्क, विना -संपर्क, गतिज, स्थितिज, मनोवैज्ञानिक किंवा माहितीच्या दृष्टीने कशा स्वरूपाची असतील तसेच ती सायबर, अंतराळ किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम यापैकी कुठल्या क्षेत्राशी निगडित असतील याबाबतची समज विकसित होईल. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, रोबोटिक्स आणि हायपरसोनिक्स यांसारख्या उदयोन्मुख आणि विघटनकारी तंत्रज्ञानाचा युद्धतंत्र वर्तणुकीवर कसा प्रभाव पडेल यावर देखील तो प्रकाश टाकेल.

आधुनिक युद्धाच्या वेगाने विकसित होत असलेल्या स्वरूपामुळे, तांत्रिक प्रगती, बदलती जागतिक गतिमानता आणि उदयोन्मुख धोक्यांमुळे तिन्ही सैन्यदलाच्या अधिका-यांसाठी भावी युद्धतंत्र या अभ्यासक्रमाची गरज निर्माण झाली आहे. अधिकारी या जटिल परिस्थितीचा सामना करण्यासाठी, नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण डावपेचांशी जुळवून घेण्यासाठी सुसज्ज असले पाहिजेत. हा अभ्यासक्रम संयुक्तपणाला प्रोत्साहन देईल आणि वाढत्या अनिश्चित आणि स्पर्धात्मक वातावरणात राष्ट्रीय हितसंबंध राखण्यात सक्षम, एकसंध, भविष्यवादी आणि तंत्रस्नेही शक्तीच्या विकासास मदत करेल.

एकात्मिक संरक्षण दल मुख्यालयाच्या अनुभवी आणि सेवा देणाऱ्या विषय तज्ञांच्या मदतीने अभ्यासक्रम तयार केला आहे. त्यानंतरचे अभ्यासक्रम या अभ्यासक्रमाच्या विषयसूचीनुसार तयार होतील आणि भारतीय सशस्त्र दलांना "भविष्यासाठी सज्ज" बनवण्याच्या मोठ्या उद्देशाने दीर्घ कालावधीचे असतील.

 

* * *

S.Patil/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2057678) Visitor Counter : 48


Read this release in: English , Urdu , Hindi