संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण राज्यमंत्री एनसीसीच्या सहराज्यप्रतिनिधी आणि अतिरिक्त/उपमहासंचालकांच्या परिषदेचे भूषवणार अध्यक्षपद

Posted On: 22 SEP 2024 6:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 सप्‍टेंबर 2024

 

संरक्षण राज्य मंत्री संजय सेठ यांच्या अध्यक्षतेखाली 23 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) सह राज्य प्रतिनिधी आणि अतिरिक्त/उपमहासंचालक (JS R&A/D) यांची परिषद होणार आहे. या द्वैवार्षिक कार्यक्रमात राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण मंत्री, अरुणाचल प्रदेश, आसाम, कर्नाटक, केरळ आणि उत्तराखंडचे शिक्षण मंत्री, गोव्याचे युवा आणि क्रीडा मंत्री, गुजरातचे प्राथमिक, माध्यमिक आणि प्रौढ उच्च शिक्षण मंत्री तसेच इतर सर्व राज्यांच्या प्रतिनिधींचा सहभाग असेल. डीजीएनसीसी, सर्व राज्यांचे एनसीसी प्रमुख आणि डीजीएनसीसी मुख्यालयाचे अधिकारी यांच्यासह संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.

परिषदेदरम्यान, प्रतिनिधी धोरणे सुधारण्यासाठी, आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि नवीन प्रशिक्षण आणि शिबीर भरवण्यासाठी पायाभूत सुविधा निर्मितीत हितधारकांमध्ये समन्वय वाढवण्याकरिता प्रतिनिधींमध्ये विचारविनिमय होईल. छात्रांना अधिक प्रेरणा देण्यासाठी आणि प्रशिक्षण कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीची खातरजमा करण्यासाठी हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. नुकत्याच मंजूर झालेल्या विस्तार योजनेची अंमलबजावणी हा देखील चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू असेल ज्यामध्ये राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेटची संख्या तीन लाखांनी वाढवण्याचे उद्दिष्ट आहे ज्याद्वारे येत्या काही वर्षांत एकूण संख्या 17 लाखांवरून 20 लाखांपर्यंत जाईल.

एनसीसी उपक्रम राबवणे ही धोरणे, वित्त आणि प्रशासन यांच्या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात सामायिक जबाबदारी आहे. त्यानुसार, ही परिषद देशव्यापी एनसीसी उपक्रमांचे नियोजन, अंमलबजावणी आणि समन्वयासाठी महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून काम करते. देशभरातील कॅडेट्सचे उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करून राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील सहकार्य वाढविण्यासाठी ही परिषद एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

 

* * *

S.Patil/V.JoshiD.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2057634) Visitor Counter : 52


Read this release in: English , Urdu , Hindi