दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

‘स्वच्छता ही सेवा- 2024’ मोहीमेत दूरसंचार विभाग सहभागी

Posted On: 21 SEP 2024 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 सप्‍टेंबर 2024

 

दूरसंचार विभाग देशभरातील आपल्या संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात, 17.09.2024 ते 02.10.2024 या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा(एसएचएस)- 2024’ मोहीम राबवत आहे.  स्वच्छ भारत अभियानाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त ही मोहीम राबवली जात आहे. ही मोहीम लोक सहभागाला प्रोत्साहन देते. त्याचबरोबर नागरिकांना देश स्वच्छ ठेवण्याच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होण्याचे आणि सफाई मित्रांची (स्वच्छता कर्मचारी) महत्त्वाची भूमिका समजून घेण्याचे आवाहन करते. स्वच्छता कामगारांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणाचा प्रचार करण्यासाठी संपूर्ण भारतात विभागाच्या संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात ‘सफाई मित्र सुरक्षा शिबिरे आयोजित केली जात आहेत. 

   

   

नवी दिल्लीतील संचार भवनातील दूरसंचार विभागाच्या मुख्यालयात आज सफाई मित्र सुरक्षा शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन उपमहासंचालक एस. बालचंद्र अय्यर यांच्या हस्ते करण्यात आले.  या शिबिरात सुमारे 100 स्वच्छता कर्मचारी आणि त्यांच्या प्रभागांची आरोग्य तपासणी करण्यात आली आणि त्यांनाही स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.

 

* * *

M.Pange/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2057401) Visitor Counter : 17


Read this release in: English , Urdu , Hindi