संरक्षण मंत्रालय
नौदल कमांडर्स परिषद - 2024/2
Posted On:
21 SEP 2024 4:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2024
दुसरी द्वि-वार्षिक नौसेना कमांडर्स परिषद 2024 ची 17 ते 20 सप्टेंबर 2024 दरम्यान नवी दिल्लीतील नौसेना भवन येथे आयोजित करण्यात आली होती. नौदलाची लढाऊ क्षमता वृद्धिंगत करण्याच्या तसेच इतर सेवांशी समन्वय साधण्याच्या हेतूने समकालीन सुरक्षा प्रतिमानांवर तसेच सखोल विश्लेषणावर या परिषदेत लक्ष केंद्रित करण्यात आले.
नवी दिल्लीतील नव्या नौसेना भवनात झालेल्या या परिषदेचा प्रारंभ नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्या उद्घाटनपर भाषणाने झाला. ही परिषद म्हणजे, नौदल कायम लढण्यास सज्ज, विश्वासार्ह, एकसंध आणि भविष्यासाठी सज्ज सेना राहील याची खात्री करण्यासाठी उपाय शोधण्यासंदर्भात चर्चा आणि विचारविनिमय करण्यासाठी भारतीय नौदलाचा एक महत्त्वाचा सर्वोच्च-स्तरीय मंच आहे, असे नौदल प्रमुखांनी अधोरेखित केले. सध्याच्या भू-सामरिक वातावरणात नवीन विघटक तंत्रज्ञान आणि सागरी क्षेत्रामध्ये विकसित होत असलेल्या धोरणांच्या प्रवाहांवर नौदल प्रमुखांनी प्रकाश टाकला.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 19 सप्टेंबर 20024 रोजी नौदल कमांडर्सना संबोधित केले आणि त्यांच्याशी संवादही साधला. संरक्षण मंत्र्यांनी हिंद महासागर क्षेत्रात सागरी सुरक्षा कायम राखण्यासाठी भारतीय नौदल करत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आणि एडनच्या आखातात समुद्रातून वाहून नेल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण वस्तूंच्या संरक्षणात भारतीय नौदलाने बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या तंत्रज्ञान प्रात्यक्षिकाला देखील संरक्षण मंत्र्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात भारतीय नौदलाची प्रमुख संशोधन आणि विकास संस्था ‘शस्त्रे आणि इलेक्ट्रॉनिक्स प्रणाली अभियांत्रिकी स्थापना’ (WESEE) यांच्यासह विविध संस्थांनी स्वदेशी उपाययोजनांचे प्रदर्शन केले, ज्यात स्वायत्त प्रणाली, डोमेन जागरूकता, सॉफ्टवेअर परिभाषित रेडिओ आणि इतर विशिष्ट तंत्रज्ञान उपक्रमांचा समावेश होता.
संरक्षण दलप्रमुख (सीडीएस), लष्कर प्रमुख (सीओएएस) आणि वायू दलप्रमुख (सीएएस) यांनी देखील या परिषदेदरम्यान नौदल कमांडर्सशी संवाद साधून त्यांच्या मोहीमांच्या परिस्थितीचे मूल्यांकन सामायिक केले तसेच राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्यासाठी सशस्त्र दलाच्या तत्परतेचे स्तर विषद केले. या परिषदेत प्रमुख मोहिमा, सामुग्री, पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक आणि मनुष्यबळ संबंधित उपक्रमांचा आढावा घेण्यात आला, तसेच, समकालीन आणि आगामी सागरी सुरक्षा आव्हाने आणि त्यांना तोंड देण्याच्या धोरणांवर चर्चा करण्यात आली.
Also Read:
भारताकडे आता हिंद महासागर क्षेत्रात पसंतीचा सुरक्षा भागीदार म्हणून पाहिले जाते; शांतता आणि समृद्धी वृद्धिंगत करण्यात नौदल महत्त्वाची भूमिका बजावत आहे : संरक्षणमंत्री
* * *
M.Pange/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2057334)
Visitor Counter : 70