इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रभावी उपायांना चालना देण्यासाठी इंडियाएआय इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेची घोषणा


महत्वाच्या क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपाय शोधून काढण्यासाठी स्पर्धेचे आयोजन

आरोग्य सेवा, प्रशासन सुधारणा, कृषी, अध्ययन अक्षमतेसाठी सहाय्यक तंत्रज्ञान, हवामान बदल आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांवर विशेष भर

Posted On: 20 SEP 2024 9:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 सप्टेंबर 2024

इंडिया एआय (IndiaAI) स्वतंत्र व्यवसाय विभागाने (आयबीडी) इंडियाएआय (IndiaAI) इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेची घोषणा केली आहे. हे चॅलेंज (आव्हान), इंडिया एआय मिशन अंतर्गत ऍप्लिकेशन्स विकास उपक्रमाचा एक भाग असून, महत्वाच्या क्षेत्रांमध्ये एआय, म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ऍप्लिकेशन्सचा विकास, तैनात आणि स्वीकार, पुढे नेणे, हे याचे उद्दिष्ट आहे. मोठ्या प्रमाणात सामाजिक-आर्थिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रभावी एआय उपायांचे स्केलिंग आणि स्वीकृतीला प्रोत्साहन देणे, हे याचे उद्दिष्ट आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024 ही आहे.

इंडियाAI इनोव्हेशन चॅलेंज

इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धा भारतीय नवोन्मेशी, स्टार्टअप्स, स्वयंसेवी संस्था , विद्यार्थी, शिक्षण तज्ज्ञ/संशोधन आणि विकास संस्था आणि कंपन्यांसाठी खुली आहे. विजेत्यांना रु. 1 कोटी पर्यंतचा  पुरस्कार आणि त्यांचा उपाय राष्ट्रीय स्तरावर लागू करण्याची संधी मिळेल.

इनोव्हेशन चॅलेंजसाठी संकेतात्मक प्रकरणांसह लक्ष केंद्रित करण्यासाठी पुढील क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत:

  • आरोग्य सेवा: एआय-जोडणी असलेले एक्स-रे वापरून रोग निदान आणि रुग्णांची काळजी यामध्ये सुधारणा, जलद रोग निदान, नेत्ररोग चिकित्सा आणि विषाणूजन्य रोग हाताळणी अधिक मजबूत करणे.
  • प्रशासनात सुधारणा: सार्वजनिक सेवेची उपलब्धता आणि तक्रार निवारणासाठी AI-संचालित भाषा तंत्रज्ञानाचा वापर.
  • कृषी: शेतकऱ्यांना AI आधारित पीक सल्लागार सेवा, आर्थिक समावेशन आणि भू-स्थानिक विश्लेषणाचा वापर करून अन्न सुरक्षा सुधारण्यासाठी सक्षम करणे.
  • लर्निंग डिसॅबिलिटी (अध्ययन अक्षमता) साठी सहाय्यक तंत्रज्ञान: स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटी, अर्थात विशिष्ट अध्ययन  अक्षमतेचे जलद निदान आणि सहाय्य, मल्टीमीडिया साधनांची आणि गेमिफाइड लर्निंगची सहज उपलब्धता.
  • हवामान बदल आणि आपत्ती व्यवस्थापन: एआय-आधारित इशारा प्रणाली आणि बहु-जोखीम संवेदनशीलता मॅपिंग.

हा उपक्रम सर्वसमावेशक विकासाकरता कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) चा लाभ घेण्याच्या भारत सरकारच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी, येथे भेट द्या:

https://indiaai.gov.in/article/unlock-the-potential-of-ai-apply-now-for-the-indiaai-innovation-challenge.

इंडियाएआय (IndiaAI) हा  इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान (MeitY) मंत्रालयाच्या डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन (DIC) अंतर्गत एक स्वतंत्र व्यवसाय विभाग (IBD) असून, IndiaAI मिशनची अंमलबजावणी करणारी संस्था आहे. समाजाच्या सर्व स्तरांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या लाभांचे लोकशाहीकरण करणे, कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये भारताच्या जागतिक नेतृत्वाला चालना देणे, तांत्रिक आत्मनिर्भरता वाढवणे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा  नैतिक आणि जबाबदार वापर सुनिश्चित करणे, हे याचे उद्दिष्ट आहे.

 

S.Kakade/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 



(Release ID: 2057220) Visitor Counter : 25


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil