कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
सीपीजीआरएएमएस वर निवारण केलेल्या तक्रारींची यादी प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाकडून प्रसिद्ध
1 ते 18 सप्टेंबर 2024 या कालावधीत केंद्रीय मंत्रालये/विभागांनी 67,688 सार्वजनिक तक्रारींचे केले निवारण
Posted On:
19 SEP 2024 6:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2024
प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाने (डीएआरपीजी) 1 ते 18 सप्टेंबर, 2024 या कालावधीत निवारण केलेल्या तक्रारींची यादी प्रसिद्ध केली आहे . त्यानुसार, केंद्रीय मंत्रालये/विभागांद्वारे 67,688 तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे .
1 ते 18 सप्टेंबर 2024 या कालावधीत तक्रार निवारण करणारी केंद्र सरकारमधील अव्वल 5 मंत्रालये/विभाग खालीलप्रमाणे आहेत:
अनु क्र.
|
मंत्रालय/विभागाचे नाव
|
एकूण निपटारा
|
1.
|
श्रम आणि रोजगार मंत्रालय
|
10,148
|
2.
|
वित्तीय सेवा विभाग (बँकिंग विभाग)
|
6,605
|
3.
|
कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग
|
5,158
|
4.
|
माजी सैनिक कल्याण विभाग
|
3,239
|
5.
|
रेल्वे मंत्रालय (रेल्वे बोर्ड)
|
3,116
|
प्रभावी तक्रार निवारणातील खालील 4 यशोगाथा पुढीलप्रमाणे आहेत:
1. ओआरओपी 2 चा तिसरा आणि चौथा हप्ता न मिळाल्याबद्दल तक्रार
2. गरोदर आणि प्रसूती खर्चाच्या दावा प्रक्रियेत विलंब
3. प्राप्तिकराची चुकीची मागणी आणि परताव्याच्या दाव्यासंबंधी तक्रार
4. सरकारी उज्ज्वला गॅस जोडणीत विलंब
नागरिक www.pgportal.gov.in या पोर्टलवर लॉग इन करून CPGRAMS पोर्टलवर तक्रार नोंदवू आणि दाखल करू शकतात.
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2056766)
Visitor Counter : 36