वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते भारत स्टार्टअप नॉलेज एक्सेस रजिस्ट्री (भास्कर) पोर्टल चे अनावरण
भारतीय स्टार्टअप्सना आत्मनिर्भर बनवून जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी सचोटी, गुणवत्तेची,गरज : गोयल
संपूर्ण स्टार्टअप परिसंस्थेसाठी भास्कर हा वन-स्टॉप डिजिटल प्लॅटफॉर्म ठरणार : गोयल
Posted On:
16 SEP 2024 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2024
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्ली येथे 'स्टार्टअप इंडिया' कार्यक्रमांतर्गत, भारत स्टार्टअप नॉलेज ऍक्सेस रजिस्ट्री (भास्कर) उपक्रमाच्या उदघाटनपर भाषणात सांगितले की डिजिटल प्लॅटफॉर्मचे भास्कर म्हणजे 'उगवणारा सूर्य' हे नामकरण अतिशय उचित आहे. सूर्यासोबत येतो तो ज्ञानोदय, प्रकाश, वाढ आणि भास्कर सहयोग, सहकार्य करण्यात आणि परस्परातील चुरस वाढण्यास मदत करणारा ठरेल असे गोयल यांनी उद्धृत केले.
स्टार्टअप परिसंस्थेला चालना देण्याबाबत गोयल म्हणाले की, ही परिसंस्था समाजोपयोगी,लोकशाही धारित आणि जागतिक पटलावर ठसा उमटवण्यासाठी सरकार प्रयत्न करेल.
स्टार्टअप इंडियाची ताकद भारताच्या विकासगाथेला हातभार लावेल असे नमूद करताना मंत्री म्हणाले की, भारतीयांना रोजगार निर्माते होण्यासाठी प्रोत्साहित करताना उज्ज्वल भविष्यासाठी अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे उमजण्यात त्यांना केलेली मदत ही भव्य संकल्पनांची पूर्तता करण्यास उपयुक्त ठरेल.
संपूर्ण स्टार्टअप परिसंस्थेसाठी डेटा प्रसार, देवाणघेवाण, परस्परसंवादासाठी वन -स्टॉप डिजिटल प्लॅटफॉर्म बनवण्याबाबत गोयल यांनी माहिती दिली. भास्कर 2.0 सुधारित वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञानासह लवकरच अद्ययावत होऊन सुरू होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
उल्लेखनीय म्हणजे, अखंड सहकार्य, ज्ञानाची देवाणघेवाण आणि नवोपक्रमासाठी एकछत्री उपाययोजनेची सुविधा देऊन भारताच्या झपाट्याने वाढणाऱ्या स्टार्टअप परिसंस्थेला सुसंगत आणि सक्षम करण्यासाठी भास्करची रचना करण्यात आली आहे. ऑगस्ट 2024 पर्यंत 1.4 लाखांहून अधिक डीपीआयआयटी -मान्यताप्राप्त स्टार्टअप्ससह, भारताने जागतिक स्तरावर सर्वात मोठी आणि सर्वात लवचिक स्टार्टअप परिसंस्था म्हणून स्वतःचा ठसा उमटवला आहे. तथापि, या प्रचंड वाढीमुळे संसाधने आणि हितधारकांची विभागणी देखील झाली आहे. इन्क्युबेटर्स, धोरणकर्ते आणि इतर प्रमुख स्टार्टअप परिसंस्था हितधारकांना एकाच छताखाली सुविधा देण्याचे आणि मागोवा घेण्याचे आव्हान देण्याचे भास्कर चे उद्दिष्ट आहे.
भास्करसाठी मुख्य मूल्य प्रस्ताव:
उद्योग आघाडी, वैविध्यपूर्ण नेटवर्किंग, वर्धित दृश्यमानता, वैयक्तिक ओळख क्रमांक:
केंद्रीय वन-स्टॉप डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून भास्कर काम करेल जो सतत विकसित होत असलेल्या स्टार्टअप परिसंस्था हितधारकांना एकाच छताखाली ठेवेल, ज्यामुळे आगामी काळात जगातील स्टार्टअप परिसंस्थेची ती सर्वात मोठी डिजिटल नोंदणी शाखा होईल.
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2055491)
Visitor Counter : 52