श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबतची तिसरी प्रादेशिक बैठक संपन्न

Posted On: 15 SEP 2024 10:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2024

कामगार आणि रोजगार मंत्रालय तसेच महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव आणि लक्षद्वीप या पश्चिमेकडील 05 राज्ये / केंद्रशासित प्रदेश (यूटी) यांच्यात कामगार आणि रोजगाराच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी दि. 15 सप्टेंबर 2024 रोजी गुजरातमधील राजकोट इथे बैठक झाली. केंद्रीय श्रम आणि रोजगार आणि युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या वतीने कामगार आणि रोजगार विषयक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी राज्ये / केंद्रशासित प्रदेशांसह देशभरात आयोजित केल्या जात असलेल्या सहा प्रादेशिक बैठकांच्या मालिकेतील ही तिसरी बैठक होती.

संघटित आणि असंघटित अशा दोन्ही क्षेत्रातील सर्व कामगारांना सर्वसमावेशक आणि सहज तसेच सुलभरित्या सामाजिक संरक्षणाचे कवच पुरवण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध असल्याचे श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी या बैठकीला संबोधित करताना सांगितले. कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (Employees' State Insurance Corporation - ESIC ) सेवा आणि लाभाचा देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तार करण्यासाठी आपले मंत्रालय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत मिळून काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. कृत्रिम बुद्धिमत्तेसह  माहिती तंत्रज्ञानाचा (IT) लाभ घेण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अधिक समन्वय राखला जाणे ही काळाची गरज असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. जागतिक मानकांनुसार प्रगत डेटा व्यवस्थापनासाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे धन्वंतरी हे बेव पोर्टल अधिक सक्षम केले जाईल असे आश्वासन श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी या बैठकीत दिले.

कर्मचारी राज्य विमा योजना (Employees' State Insurance Scheme - ESIS) आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये (AB-PMJAY) मेळ साधण्यासाठीचे नियोजन केले जात असल्याचेही केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी यावेळी अधोरेखित केले. या धोरणांतर्गत कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या / कर्मचारी राज्य विमा योजनेच्या लाभार्थ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या सूचीमधील 30,000 पेक्षा जास्त रुग्णालयांमध्ये दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील तसेच खाजगी क्षेत्रातील रुग्णालयांद्वारा दिल्या जाणाऱ्या सेवांच्या उपलब्धतेसंदर्भादले भेद दूर होतील आणि लाभार्थ्यांना कोणत्याही सूचीबद्ध रुग्णालयात सर्वात प्रभावी उपचार घेता येतील असे  श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले.


Jaydevi PS/T.Pawar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 


(Release ID: 2055316) Visitor Counter : 47


Read this release in: English , Hindi , Gujarati , Tamil