मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह 13 सप्टेंबर 2024 रोजी भुवनेश्वर येथे पशुसंवर्धन आणि दुग्धक्षेत्राच्या पावसाळी बैठकीचे भूषविणार अध्यक्षस्थान
Posted On:
12 SEP 2024 2:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2024
केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास आणि पंचायती राज मंत्री, राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह येत्या 13 सप्टेंबर 2024 रोजी लोक सेवा भवन, भुवनेश्वर,ओदिशा येथे होणाऱ्या, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या पावसाळी बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
या मेळाव्याच्या उद्घाटन सत्राला ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून ओदिशाच्या उपमुख्यमंत्री पार्वती परिदा विशेष अतिथी म्हणून उपस्थित रहाणार आहेत. मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग यांनी या मान्सून मेळाव्याचे आयोजन केले आहे.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विविध योजनांच्या अपेक्षा जाणणे , योजनांच्या प्रगतीचा आढावा घेणे,त्यांचे खोलवर होणारे परिणाम जाणून घेणे तसेच योजनांच्या मध्यावर त्यांचा अभ्यास करून त्यातील सुधारणांवर चर्चा करणे तसेच या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अभिसरण कार्यक्रम आराखडा तयार करणे यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील पशुसंवर्धन मंत्री संबंधित अधिकाऱ्यांसह उपस्थित राहणार आहेत.
2014-15 ते 2022-23 पर्यंत पशुधन क्षेत्रात 9.82% इतक्या चक्रवाढ वार्षिक दराने उल्लेखनीय वाढ झाली आहे.कृषी आणि संबंधित क्षेत्रातील एकूण मूल्यवर्धित मूल्यामध्ये त्याचे योगदान 24.36% वरून 30.22% पर्यंत असे लक्षणीयरीत्या वाढले आहे. 2022-23 मध्ये,या क्षेत्राने एकूण मूल्य वर्धनात 5.5% योगदान दिले, जे अर्थव्यवस्थेतील त्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे प्रतिबिंब स्पष्टपणे दर्शवत आहे.
गेल्या नऊ वर्षांत देशातील दूग्ध उत्पादन 57.62% ने वाढले आहे, 2014-15 मध्ये 146.3 दशलक्ष टन होते ते 2022-23 मध्ये 230.60 दशलक्ष मेट्रिक टन इतके झाले आहे. हा विकास दर, वार्षिक सरासरी 5.9%, असून तो जागतिक सरासरीपेक्षा 2% जास्त आहे.याव्यतिरिक्त , दरडोई दुधाची उपलब्धता 2013-14 मधील 307 ग्रॅम प्रतिदिन यावरून 2022-23 मध्ये 459 ग्रॅम प्रतिदिन इतकी झाली असून जागतिक सरासरीच्या 325 ग्रॅम्सला याने मागे टाकले आहे.या सर्व विकासामुळे पशुधन क्षेत्र हे "सूर्योदय क्षेत्र" बनले आहे.
मान्सून मेळाव्यामुळे विविध राज्यांत अंमलबजावणी करताना येणाऱ्या अनेक आव्हानांवर मात करणे, अनेक विषयांवर अर्थपूर्ण चर्चा तसेच विचारांची देवाणघेवाण सुरू होण्याची अपेक्षा आहे. केंद्रीय कॅबिनेट मंत्री (FAHD), राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील पशुसंवर्धन मंत्र्यांसोबत होणाऱ्या संवादात्मक सत्रांतून संबंधित राज्यांमधील यशोगाथा आणि सर्वोत्तम पद्धती दाखविण्याची संधीही यामुळे उपलब्ध होईल आणि सर्वांसाठीच शिकण्यासाठी हा एक उत्तम अनुभव ठरेल.
पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या "100 दिवसांच्या कृती आराखड्याचा" भाग असलेल्या अनेक मोठ्या घोषणा आणि विविध उपक्रमांचा शुभारंभ देखील यावेळी अपेक्षित आहे.
N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2054155)
Visitor Counter : 43