शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

2024 च्या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या पूर्वसंध्येला संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ‘साक्षरतेचे विविध आयाम’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद

Posted On: 07 SEP 2024 7:16PM by PIB Mumbai

 

शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव, संजय कुमार यांनी आज नवी दिल्ली येथील सीआयईटी, एनसीईआरटी, मध्ये ‘साक्षरतेचे विविध आयाम’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवले. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने 2024 चा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करण्याच्या निमित्ताने, उद्या विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी या आभासी परिषदेचे आयोजन केले होते.

आपल्या भाषणात संजय कुमार यांनी साक्षरतेच्या व्याख्येत आता मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान साक्षरतेसह डिजिटल, आर्थिक, आणि कायदेशीर साक्षरता यांसारख्या महत्त्वपूर्ण जीवन कौशल्यांचा समावेश कसा केला आहे हे स्पष्ट केले. साक्षरतेने लोकांना जीवनाची वाटचाल सोपी करायला हवी, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी सांगितले की, शहरी आणि ग्रामीण लोकसंख्येतील तसेच पुरुष आणि महिलांमधील साक्षरतेतील अंतर कमी करण्यासाठी आपण  युएलएलएएस(उल्लास) या चौकटीखाली कार्य करणे आवश्यक आहे. साक्षरता हे परिवर्तनाचे शक्तिशाली साधन बनायला हवे आणि आपल्या प्रयत्नांना आधार देणाऱ्या रणनीती आणि चौकटींचा आपण काळजीपूर्वक विचार केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या “बहुभाषिकतेद्वारे साक्षरतेचा प्रचार” या विषयावर भर देताना, त्यांनी नमूद केले की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या मुख्य स्तंभांपैकी एक म्हणजे बहुभाषिकता आहे. मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिकवल्यास त्यांना उत्तम प्रकारे शिकता येते, असेही त्यांनी सांगितले. महिलांचे शिक्षण वाढवून नोकरदारांमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व कसे वाढवता येईल, यावरही त्यांनी भर दिला.

शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या संयुक्त सचिव अर्चना शर्मा अवस्थी यांनी उद्घाटनपर भाषण केले आणि युएलएलएएस या नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या महत्त्वावर सादरीकरण केले, जो देशभरात प्रौढ साक्षरता वाढविण्यासाठी सुरू करण्यात आला आहे.

परिषदेमध्ये “भारतामध्ये साक्षरतेचे विविध आयाम शोधणे” आणि “साक्षरतेवर जागतिक दृष्टिकोन” या दोन सत्रांचा समावेश होता. पहिले सत्र सीआयईटी, एनसीईआरटीचे संयुक्त संचालक डॉ. अमरेंद्र पी. बेहरा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. या सत्रात भारतातील साक्षरतेवरील विविध दृष्टिकोनांवर चर्चा झाली.

***

S.Patil/G.Deoda/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2052856) Visitor Counter : 68


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil