कंपनी व्यवहार मंत्रालय
‘आयईपीएफए’ चा 8 वा स्थापना दिवस नवी दिल्ली येथे साजरा
नाविन्यपूर्ण जागरूकता कार्यक्रमांद्वारे गुंतवणूकदारांना सक्षम बनविण्यावर 8व्या स्थापना दिनाच्या समारंभामध्ये दिले प्राधान्य
Posted On:
07 SEP 2024 7:57PM by PIB Mumbai
भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या (एमसीए) अंतर्गत कार्यरत गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (आयईपीएफए) ने नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (एनसीएईआर) आणि इन्स्टीट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी यांच्या सहकार्याने नवी दिल्ली येथे काल 8 वा स्थापना दिवस साजरा केला. आयईपीएफएची स्थापना 7 सप्टेंबर 2016 रोजी कंपनी कायदा, 2013 मधील कलम 125 च्या उपकलम 5 च्या तरतुदींनसार करण्यात आली आहे.
आयईपीएफएने स्थापना दिनानिमित्त गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित केले. देशभरातील गुंतवणूकदारांसाठी अधिक लवचिक धोरण असावे आणि त्याविषयी सर्व माहिती पुरवून समुदायाला प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेने सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यात आली. स्थापना दिनी आयोजित परिषदेची संकल्पना "गुंतवणूकदारांचे सक्षमीकरण: फसवणूक आणि डिजिटल घोटाळ्यांचा सामना करण्यासाठी आर्थिक साक्षरता" अशी ठेवण्यात आली होती. या संकल्पनेनुसार गुंतवणुकदारांना वाढत्या गुंतागुंतीच्या आर्थिक परिदृश्यात स्वतःचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि साधने सुसज्ज करण्याची वाढती गरज असल्याची माहिती देण्यात आली. सध्याच्या युगात डिजिटल व्यवहार सामान्य आहेत आणि ऑनलाइन घोटाळे वाढत आहेत, अशावेळी आर्थिक साक्षरतेचे महत्त्व दुर्लक्षित करता येणार नाही, असे परिषदेत सांगण्यात आले.
यावेळी आयईपीएफएच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता शाह अकेला, आणि एमसीएचे सहसचिव,यांची मुख्य भाषणे झाली. शिक्षण आणि संरक्षण विषयक उपक्रमांद्वारे गुंतवणूकदारांना सक्षम करण्यासाठी आयईपीएफए समर्पित असेल यावर सातत्याने भर देत असल्याचे सांगितले.
एनसीएईआर मधील आयईपीएफ प्रमुख व्याख्याते डॉ. सी.एस. महापात्रा यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. "गुंतवणूकदारांचे सक्षमीकरण: फसवणूक आणि डिजिटल घोटाळ्यांचा सामना करण्यासाठी आर्थिक साक्षरता" या विषयावरील तांत्रिक सत्राचाही या परिषदेत समावेश होता. या सत्रात आयईपीएफए महाव्यवस्थापक लेफ्टनंट कर्नल राजेश कुमार यांचे भाषण झाले. यावेळी सरकारी संस्था आणि धोरणकर्त्यांची अंतर्दृष्टी यावर भर देण्यात आला. कार्यक्रमामध्ये आयईपीएफएचे उपसंचालक गौरव गुप्ता, आयईपीएफए मंडळ सदस्य आणि मूल्य संशोधनाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी धीरेंद्र कुमार, वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे संयुक्त सचिव (गुंतवणूक) राजीव सक्सेना, माजी प्राप्तीकर आयुक्त आणि सेबीचे कार्यकारी संचालक डॉ. मानस शंकर रे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी उपमहा व्यवस्थापक आणि उप लोकपाल शैलेंद्र नाथ झा सहभागी झाले होते.
तांत्रिक सत्राचा समारोप संवादात्मक प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमाने झाला. याप्रसंगी पॅनेलमधील सदस्यांना गुंतवणूक आणि गुंतवणूकदार संरक्षण आणि आर्थिक साक्षरतेशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी मिळाली.
***
S.Patil/S.Bedekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2052854)
Visitor Counter : 56