संरक्षण मंत्रालय
नागरी समाज आणि लष्करामधील बंध दृढ करण्यासाठी आणि युवा वर्गाला राष्ट्र उभारणीसाठी प्रेरित करण्यासाठी रांची येथे 'सशक्त सेना, समृद्ध भारत' प्रदर्शनाचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
04 SEP 2024 5:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2024
नागरी समाज आणि सशस्त्र दल यांच्यातील बंध दृढ करण्यासाठी आणि युवा वर्गाला राष्ट्र उभारणीसाठी प्रेरित करण्यासाठी, झारखंड मध्ये रांची येथील मोराबादी मैदानावर 06 ते 08 सप्टेंबर 2024 या कालावधीत, ‘सशक्त सेना, समृद्ध भारत’ हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, यावेळी समाजातील तसेच लष्करातील अनेक मान्यवर उपस्थित राहतील. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार असून, यावेळी नागरिकांना सशस्त्र दलांबद्दल जाणून घेण्याची आणि सैनिकांशी संवाद साधण्याची संधी मिळेल.
या प्रदर्शनात शस्त्रे आणि उपकरणे, एअर शो, डेअरडेव्हिल मोटरसायकल शो, डॉग शो आणि हॉट एअर बलूनिंगची प्रात्यक्षिके प्रदर्शित केली जातील. या प्रदर्शनात विविध आर्मी बँड, कलारीपयट्टू, मल्लखांब, भांगडा आणि मार्शल आर्ट्सच्या सादरीकरणासह विविध सांगितिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश असेल, ज्यामधून देशाचा वैविध्यपूर्ण वारसा प्रदर्शित केला जाईल. याशिवाय युवकांना सशस्त्र दलात सहभागी होण्याची प्रेरणा देण्यासाठी, तसेच त्याची प्रक्रिया समजावून या क्षेत्रातील जीवनाबद्दल माहिती देण्यासाठी प्रदर्शनात करियर आणि समुपदेशन स्टॉल्स उभारले जातील.
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2051799)
आगंतुक पटल : 69