संरक्षण मंत्रालय

देशाच्या संरक्षणविषयक सज्जतेत वाढ करण्यासाठी संरक्षण अधिग्रहण परिषदेने 1.45 लाख कोटी रुपये मूल्याच्या 10 भांडवली अधिग्रहण प्रस्तावांना दिली मंजुरी

Posted On: 03 SEP 2024 6:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 सप्‍टेंबर 2024

 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण  अधिग्रहण परिषदेने  (डीएसी) आज, दिनांक 03 सप्टेंबर 2024 रोजी 1,44,716 कोटी रुपये मूल्याचे 10 भांडवली अधिग्रहण प्रस्ताव आवश्यकतेचा स्वीकार (एओएन) म्हणून मंजूर केले. या एओएन्ससाठी होणाऱ्या एकूण खर्चापैकी 99% बाबतीत (भारतीय उद्योगांकडून) विकत घ्या आणि (भारतीय- स्वदेशी पद्धतीने संरचित, विकसित आणि उत्पादित सामग्री) विकत घ्या या धोरणांतर्गत  स्वदेशी स्त्रोतांचा वापर केला जाईल.

भारतीय लष्कराच्या रणगाडा पथकाच्या आधुनिकीकरणासाठी, भविष्याच्या दृष्टीने सुसज्ज लढाऊ वाहनांच्या (एफआरसीव्हीज)च्या खरेदीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. हे एफआरसीव्ही म्हणजे भविष्यवादी तंत्रज्ञान असलेला लढाईसाठी वापरला जाणारा प्रमुख रणगाडा असून त्यात उच्च गतिशीलता क्षमता, सर्व प्रकारच्या प्रदेशात कार्य करण्याची क्षमता, विविध स्तरीय संरक्षक कवचे, तसेच परिस्थितीची जाणीव ठेवून वास्तव वेळात अचूक आणि घातक मारा करण्याची क्षमता असेल.

हवेतील लक्ष्य शोधून काढून आणि त्याचा माग काढून त्यावर हल्ला करण्याबाबत मार्गदर्शन करणाऱ्या हवाई संरक्षणविषयक फायर कंट्रोल  रडार्सच्या खरेदीसाठी देखील एओएन मंजूर करण्यात आले. यांत्रिकी कार्यवाही  सुरु असताना, प्रत्यक्ष कार्यस्थळी दुरुस्ती शक्य करण्यासाठी योग्य क्रॉस कंट्री गतिशीलता असलेल्या फॉर्वर्ड रिपेअर टीम (ट्रॅक्ड) साठीचा प्रस्ताव देखील संमत करण्यात आला. हे उपकरण आर्मर्ड व्हेईकल्स निगम या कंपनीने संरचित आणि विकसित केले असून यांत्रिक पायदळ तुकडी तसेच आर्मर्ड पलटण या दोन्हींतील वापरासाठी अधिकृत करण्यात आली आहे.

भारतीय तटरक्षक दलाच्या (आयसीजी) क्षमतांमध्ये वाढ करण्यासाठी तीन एओएन्स मंजूर करण्यात आली आहेत.डॉर्नियर-228 विमान हे खराब हवामानात उच्च प्रतीची कार्यकारी वैशिष्ट्ये दर्शवणारे आणि प्रगत तंत्रज्ञान आणि वाढीव पल्ल्याच्या कार्याची क्षमता असलेले अत्याधुनिक टेहळणी विमान टेहळणी, सागरी क्षेत्रातील गस्त, शोध आणि बचाव तसेच आपत्ती निवारण विषयक कार्यांबाबतच्या आयसीजीच्या क्षमतेत मोठी भर घालेल.

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2051461) Visitor Counter : 33


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu