कोळसा मंत्रालय
देशातील कोळसा उत्पादनात गेल्या वर्षापेक्षा 7.12%ची वाढ होऊन आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये देशात 370 दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन
Posted On:
27 AUG 2024 8:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑगस्ट 2024
केंद्रीय कोळसा मंत्रालयाने 25 ऑगस्ट 2024 पर्यंत एकंदर कोळसा उत्पादनात मोठी झेप घेतली आहे. दिनांक 25.08.2024 रोजी उपलब्ध आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये देशातील समग्र कोळसा उत्पादनात लक्षणीय वाढ होऊन ते 370.67 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचले आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मधील याच कालावधीत झालेल्या 346.02 दशलक्ष टन कोळसा उत्पादनाच्या तुलनेत यावर्षी 7.12% वाढ झालेली दिसून आली आहे.
तसेच, दिनांक 25.08.2024 रोजी उपलब्ध आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये देशातील एकंदर कोळसा वाहतुकीत देखील लक्षणीय वाढ झाली असून ती 397.06 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या वर्षी झालेल्या 376.44 दशलक्ष टन कोळसा वाहतुकीच्या तुलनेत यावर्षी 5.48% वाढ झाली आहे.
उर्जा क्षेत्राला देण्यात आलेल्या कोळशाचा विचार करता, गेल्या वर्षी उर्जा क्षेत्रासाठी देण्यात आलेल्या 313.44 दशलक्ष टन कोळशाच्या तुलनेत, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 25 ऑगस्ट 2024 पर्यंत 325.97 दशलक्ष टन कोळशाचे वितरण झाले होते. दिनांक 01.04.24 रोजी टीपीपी येथे खुल्या झालेल्या 47 दशलक्ष टनाच्या प्रचंड सुरवातीच्या साठवणीनंतर देखील वाढ झाली आहे. यातून, उर्जा क्षेत्राला होणाऱ्या अखंडित कोळसा पुरवठ्याची सुनिश्चिती होत आहे.
खाणींच्या मुखाजवळील पिटहेड्स, टीपीपीएस आणि वाहतुकीच्या दरम्यान असलेला कोळसा मिळून 25 ऑगस्ट 2024 रोजी उपलब्ध एकंदर कोळशाचा साठा 121.57 दशलक्ष टन झाला आहे. गेल्या वर्षीच्या याच काळातील 89.28 दशलक्ष टन कोळशाच्या साठ्यात 36.2% ची लक्षणीय वाढ झाल्याचे दिसते आहे. तसेच गेल्या वर्षीच्या 29.47 दशलक्ष टन कोळशाच्या साठ्याच्या तुलनेत यावर्षी 25 ऑगस्ट 2024 पर्यंत टीपीपीएस (डीसीबी) चा कोळसा साठा 37.55 दशलक्ष टन आहे, यावरून या साठ्यात 27.41% वाढ झाल्याचे दिसते.
देशातील अधिक प्रमाणातील कोळसा साठा, केंद्रीय कोळसा मंत्रालयाची देशात कोळशाचा मुबलक पुरवठा करण्याप्रती कटिबद्धता अधोरेखित करतो. कोळसा उत्पादन आणि वाहतूक यांच्यातील सातत्यपूर्ण वाढ आणि साठवणीचे स्तर, देशाच्या उर्जा सुरक्षाविषयक ध्येयांना पाठींबा देत असतानाच देशात विश्वसनीय उर्जा पुरवठ्याच्या सुनिश्चितीसाठी मंत्रालयातर्फे सुरु असलेले प्रयत्न अधोरेखित करतो.
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2049213)
Visitor Counter : 78