दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दूरसंचार सेवा आलेखन कोड निश्चित करण्यासाठी दूरसंचार भागधारक सल्ला समिती सदस्यांची घेतली दुसरी बैठक
भारताच्या गरजेनुसार संशोधनाला पद्धतशीरपणे संरेखित करण्याचा प्रस्ताव उद्योगधुरीणांनी दिला आणि एक समृद्ध "मानक समुदाय" स्थापन करण्याची मांडली संकल्पना
पुढील 3 वर्षांत सर्व 6G पेटंट्सपैकी 10% हिस्सा प्राप्त करण्याचे आणि जागतिक मानकांत 1/6 योगदान देण्याचे उद्दिष्ट ठेवले समोर
Posted On:
24 AUG 2024 1:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑगस्ट 2024
ईशान्य क्षेत्राचे दळणवळण आणि विकास मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि दळणवळण राज्यमंत्री डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी, यांनी शुक्रवारी नुकत्याच स्थापन झालेल्या दूरसंचार सेवा प्रदात्यांच्या (TSPs) भागधारकांच्या सल्ला समिती (स्टेकहोल्डर्स ॲडव्हायझरी कमिटी, SAC) सदस्यांसोबत दुसरी बैठक घेतली. भारताच्या दूरसंचार परिसंस्थेचा भविष्याचा होणारा विस्तार आणि त्याला आकार देण्यासाठी सर्व भागधारकांना सहभागी करून घेणे आणि सर्वसमावेशक आणि सहयोगी धोरण निर्णय घेण्यास प्रोत्साहन देणे, हा दूरसंचार विभागाच्या (DoT) या पुढाकाराचा उद्देश होता.
दूरसंचार सेवा प्रदात्यांच्या (TSP) पहिल्या भागधारक सल्ला समिती (SAC) बैठकीच्या दरम्यान,काही क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित केले होते. काल शुक्रवारी झालेल्या बैठकीत, आंतरराष्ट्रीय मानके आणि बौद्धिक संपदा आणि पेटंटसाठी असलेली अनिवार्य मानके (SEP) यामधील भारताचा वाटा, दूरसंचार सेवांच्या गुणवत्तेतील कमतरता (कनेक्टिव्हिटी गॅप) यावर चर्चा झाली.
यावेळी सॅकच्या(SAC) सदस्यांनी भारताच्या गरजेनुसार संशोधनाला पद्धतशीरपणे संरेखित करण्याच्या प्रस्तावावर भर दिला; जेणेकरून एक समृद्ध मानक समुदाय तयार होईल. भारताने यापूर्वीच Bhart6G Vision आणि Bhart6G Alliance याचा आरंभ केला आहे, तसेच पेटंट आणि IPR यास समर्थन देणारा आराखडा, टेस्टबेड्सचे कार्यान्वित करणे इत्यादी बाबींसाठी पुढाकार घेऊन काम केले आहे. या सर्व 6G पेटंटमधे देशाचा 10% हिस्सा असून आणि जागतिक मानकांना प्रोत्साहन देण्यात भारत 1/6 वा योगदान देण्याची आकांक्षा बाळगू शकतो. ते साध्य करण्यासाठी आवश्यक असा 3 वर्षांचा आराखडा ‘सॅक’ने यावेळी प्रस्तावित केला.
भारताला तंत्रज्ञानातील महत्त्वाचे स्थान प्रस्थापित करण्यासाठी, विश्वसनीय कनेक्टिव्हिटीसह वायरलाइन आणि इंटेलिजेंट वायरलेस ब्रॉडबँड नेटवर्क या दोन्हींमधील प्रवेश महत्त्वाचा आहे, असे मत सॅकने (SAC) या बैठकीत व्यक्त केले. टीएसपीजनी (TSPs) देशात 100% ब्रॉडबँड कव्हरेजच्या मार्गावरील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सहाय्यक धोरण तयार करण्याची मागणी केली. दूरसंचार सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी विविध सुविधा आणि संभाव्य उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली.
दळणवळण मंत्री शिंदे यांनी SAC सदस्यांना चर्चेत मांडलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक महत्त्वपूर्ण मार्ग परिभाषित करण्यास सांगितले आणि ते साध्य करण्यासाठी सरकारसह विविध भागधारकांची त्यातली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले. नागरिकांना चांगल्या दर्जाची दूरसंचार सेवा मिळावी यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन त्यांनी टीएसपींना या बैठकीत केले.
दूरसंचार विभागाला संबंधित विविध बाबींचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मंत्री शिंदे यांनी सहा वेगळ्या स्टेकहोल्डर्स ॲडव्हायझरी समित्या (SACs) स्थापन केल्या आहेत. दूरसंचार क्षेत्राशी संबंधित बाबींवर सरकारसोबत सातत्याने द्विपक्षीय संवाद साधणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. उद्योगधुरीण, वरीष्ठ कार्यकारी अधिकारी , शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, उद्योजक आणि स्टार्ट-अप हे या सहा सल्लागार समित्यांत (SACs) सदस्य असतील.
* * *
S.Nilkanth/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2048444)
Visitor Counter : 47