श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जून 2024 महिन्यात इएसआय योजनेंतर्गत नवीन 21.67 लाख कामगारांची नावनोंदणी

Posted On: 22 AUG 2024 6:48PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 ऑगस्ट 2024

 

कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या आज जारी करण्यात आलेल्या तात्पुरत्या वेतनश्रेणीच्या आकडेवारीनुसार जून 2024 महिन्यात 21.67 लाख नवीन कर्मचारी जोडले गेले आहेत.

जून, 2024 मध्ये 13,483 नवीन आस्थापना कर्मचारी राज्य विमा योजनेच्या सामाजिक सुरक्षा कक्षेत आणल्या गेल्या आहेत ज्यामुळे अधिक कामगारांची सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करता येईल.

याशिवाय,  मे 2023 च्या तुलनेत निव्वळ नोंदणीमध्ये 7% वाढ झाल्याचे वार्षिक विश्लेषणातून दिसून येते.  

Year on Year Comparison

Head

June 2023

June 2024

Growth

Number of New employees registered during the month

20.27 Lakh

21.67 Lakh

1.40 Lakh

 

या महिन्यादरम्यान नवीन समावेश झालेल्या एकूण 21.67 लाख कर्मचाऱ्यांपैकी 10.58 लाख कर्मचारी म्हणजे एकूण नोंदणीच्या सुमारे 49% कर्मचारी 25 वर्षे वयोगटातील आहेत, हे देखील या माहितीमधून लक्षात येते.

तसेच, वेतनश्रेणीच्या डेटाचे लिंगनिहाय विश्लेषण असे दर्शविते की जून, 2024 मध्ये महिला सदस्यांची निव्वळ नोंदणी 4.32 लाख होती. याशिवाय, एकूण 55 तृतीयपंथी कर्मचाऱ्यांनी जून 2024 मध्ये कर्मचारी राज्य विमा  योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे. ही आकडेवारी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत कर्मचारी राज्य विमा महामंडळाचा लाभ पोहोचवण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेची पुष्टी करते.

डेटा निर्मिती हा एक निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याने हा वेतनपट डेटा तात्पुरता आहे.

 

* * *

S.Kane/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2047781)
Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi