कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्सने आयोजित केलेला FIPIC/IORA देशांच्या नागरी सेवकांसाठीचा सार्वजनिक धोरण आणि प्रशासनावरील प्रगत नेतृत्व विकास कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न
2 आठवड्यांच्या कार्यक्रमात 11 देशांमधील 40 नागरी सेवकांचा सहभाग
Posted On:
17 AUG 2024 7:04PM by PIB Mumbai
नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स (एनसीजीजी ), अर्थात राष्ट्रीय सुशासन केंद्राने नवी दिल्ली येथे आयोजित केलेला FIPIC/IORA, अर्थात हिंद प्रशांत द्वीपे सहकार्य मंच आणि हिंद महासागर क्षेत्र संघटना क्षेत्रामधील विविध देशांसाठी नागरी सेवकांसाठीचा सार्वजनिक धोरण आणि प्रशासनावरील पहिला प्रगत नेतृत्व विकास कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. 5 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये सेशेल्स, सोमालिया, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, श्रीलंका, टांझानिया, मादागास्कर, फिजी, केनिया, मालदीव आणि मोझांबिक या देशांचे 40 प्रतिनिधी सहभागी झाले होते. सहभागींमध्ये महासंचालक, सचिव, जिल्हा प्रशासक, महाव्यवस्थापक, वरिष्ठ मनुष्यबळ विकास अधिकारी आणि उद्योग समन्वयक यासारख्या महत्वाच्या पदांवर कार्यरत व्यक्ती असून, संबंधित देशांमधील महत्वाची मंत्रालये आणि संस्थांचे प्रतिनिधित्व केले.
एनसीजीजीचे महासंचालक आणि प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे सचिव, व्ही. श्रीनिवास, यांनी समारोप समारंभाला संबोधित केले. ज्ञान आणि अनुभवांचे परस्पर आदानप्रदान सर्व सहभागी अधिकाऱ्यांना त्यांच्या देशांत सुप्रशासन वाढवण्यामध्ये आणि सार्वजनिक धोरणांची अंमलबजावणी करण्यामध्ये लक्षणीय यश मिळवून देईल, असे त्यांनी अधोरेखित केले.
***
S.Kakade/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2046370)
Visitor Counter : 56