श्रम आणि रोजगार मंत्रालय

केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) निरीक्षक अधिक सेवा प्रदात्यांसाठी अद्ययावत माहिती पुस्तिका केली जारी

Posted On: 14 AUG 2024 9:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2024

केंद्रीय कामगार आणि रोजगार आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी आज नवी दिल्ली येथे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) निरीक्षक अधिक सेवा प्रदात्यांसाठी अद्ययावत माहिती पुस्तिका जारी केली.

निरीक्षकाच्या भूमिकेत महत्वाचे परिवर्तन झाल्याचे मांडवीय यांनी अधोरेखित केले.‘निरीक्षक’ पदाची भूमिका, ‘सेवा प्रदाता’ म्हणून अधिक असून, यामधून क्षेत्रीय कार्यकर्त्यांकडून आता अपेक्षित असलेल्या जबाबदाऱ्यांची व्याप्ती प्रतिबिंबित होते. अद्ययावत माहिती पुस्तिकेत काळजीपूर्वक डिझाइन केलेल्या 16 प्रकरणांचा समावेश असून, त्यामध्ये निरीक्षक अधिक सेवा प्रदात्याची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांचा संपूर्ण आलेख समाविष्ट आहे. नियामक पर्यवेक्षणापासून ते अनुपालनाला प्रोत्साहन देण्यापर्यंत, आणि पोहोच वाढवण्याच्या उपक्रमांपासून, ते आवश्यक भागीदारी निर्माण करण्यापर्यंत, ही पुस्तिका आपल्या सर्व भागधारकांसाठी दिशादर्शक ठरेल. व्यवसाय सुलभता वाढवण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी ही माहिती पुस्तिका आत्मसात करावी,असे आवाहन त्यांनी केले.

नियमावली, भारतीय न्याय संहिता (BNS), भारतीय नागरीक सुरक्षा संहिता (BNSS), आणि भारतीय साक्ष अधिनियम (BSA), या तीन नवीन फौजदारी कायद्यांशी सुसंगत आहे, जे सध्याच्या कायद्याच्या चौकटीचा अविभाज्य भाग आहेत. माहिती पुस्तिका कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची (EPFO), पारदर्शकता, सचोटी आणि कार्यक्षमते प्रति वचनबद्धता प्रतिबिंबित करते. ही पुस्तिका, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या देशभरतील निरीक्षक आणि सेवा प्रदात्यांना सामाजिक सुरक्षेचे गतिमान, सहानुभूतीशील आणि साधनसंपन्न चॅम्पियन बनण्याची प्रेरणा देईल.

यापूर्वीच्या चिंतन शिबिरातील कार्यवाही व परिणामांचाही केंद्रीय मंत्र्यांनी आढावा घेतला.

S.Patil/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2045473) Visitor Counter : 57