सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
'हर घर तिरंगा, हर घर खादी’ अभियानांतर्गत, खादी स्टोअरमध्ये 3X2 फूट आकाराचे विशेष राष्ट्रीय ध्वज 198/- रुपये या विशेष किंमतीत उपलब्ध
Posted On:
09 AUG 2024 8:28PM by PIB Mumbai
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या (एमएसएमइ) खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (केव्हीआयसी) अध्यक्ष मनोज कुमार आणि राज्यसभा खासदार अरुण सिंग यांनी नवी दिल्लीतील कनॉट प्लेसमधील बाबा खड़क सिंग मार्गावर स्थित खादी ग्रामशिल्प लाउंज येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा शुभारंभ केला.
या प्रसंगी बोलताना राज्यसभा खासदार अरुण सिंग यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशवासीयांना आपल्या घराच्या छतावर खादीचे राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचे आवाहन केले, जेणेकरून खादी व ग्रामोद्योग आयोगाशी संबंधित कारागिरांना अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
माध्यमांशी बोलताना, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृतकाळात खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने खादी या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या वारशाला नव्या उंचीवर नेले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाला भारताच्या प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने देशभर ‘हर घर तिरंगा, हर घर खादी’ अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत, खादी/पॉलिस्टरचे 3X2 फूट आकाराचे राष्ट्रीय ध्वज खादी स्टोअरमध्ये विशेष किंमतीत 198/- रुपयामध्ये उपलब्ध आहेत.
‘हर घर तिरंगा’ अभियानाचा शुभारंभ करताना खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी सांगितले की, गांधीजींचा वारसा असलेली खादी प्रत्येक गावात खादी क्रांतीद्वारे विकसित भारत अभियानाला बळ देत आहे.
***
S.Kane/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2043930)
Visitor Counter : 64