पर्यटन मंत्रालय
सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम पुरस्कार
Posted On:
08 AUG 2024 3:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2024
सर्वोत्तम पर्यटनस्थळ या बिरुदास पात्र ठरणाऱ्या गावाचा गौरव करण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने ‘सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम’ ही स्पर्धा सुरु केली आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक संपत्तीचे जतन करणाऱ्या, समुदायाधारित मूल्ये आणि जीवनशैलीला प्रोत्साहन देणाऱ्या तसेच आर्थिक,सामाजिक आणि पर्यावरणीय अशा सर्व पैलूंसह शाश्वततेप्रती सुस्पष्ट वचनबद्धता असणाऱ्या, पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावाला हा पुरस्कार देऊन सन्मानित करणे हा या उपक्रमाच्या मागील उदेश आहे. यासाठी खालील विभागांच्या अंतर्गत प्रस्ताव मागवण्यात आले होते:
(i)सर्वोत्तम पर्यटन ग्राम – वारसा
(ii)सर्वोत्तम पर्यटन ग्राम – कृषी पर्यटन
(iii)सर्वोत्तम पर्यटन ग्राम – हस्तकला
(iv)सर्वोत्तम पर्यटन ग्राम – दायित्व निभावणारे पर्यटन
(v)सर्वोत्तम पर्यटन ग्राम – चैतन्याने सळसळती गावे
(vi)सर्वोत्तम पर्यटन ग्राम – साहसी पर्यटन
(vii)सर्वोत्तम पर्यटन ग्राम – समुदायाधारित पर्यटन
(viii)सर्वोत्तम पर्यटन ग्राम – स्वास्थ्य
https://www.rural.tourism.gov.in या पोर्टलच्या माध्यमातून अर्ज सादर करण्यात आले तसेच त्यांची छाननी करून जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर मूल्यांकन देखील करण्यात आले.
वर्ष 2023 मध्ये पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि त्यात एकूण 35 गावांना सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम म्हणून गौरवण्यात आले.
केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज राज्यसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2043075)
Visitor Counter : 97