अवजड उद्योग मंत्रालय
हायब्रीड वाहने
Posted On:
06 AUG 2024 7:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2024
भारतात इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहनांच्या उत्पादन आणि वापराला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करणे आणि वाहनांमधून होणाऱ्या उत्सर्जनाच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने 2015 मध्ये इलेक्ट्रिक आणि हायब्रीड इलेक्ट्रिक वाहनांचा जलद अवलंब आणि उत्पादन (फेम इंडिया) योजना सुरू केली.त्यानंतर, फेम इंडिया योजनेचा टप्पा-II 11,500 कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतुदीसह 1 एप्रिल, 2019 पासून 5 वर्षांच्या कालावधीसाठी लागू करण्यात आला.फेम II अंतर्गत, हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या ग्राहकांना (खरेदीदार/अंतिम वापरकर्ते) प्रोत्साहन दिले जाते.
अवजड उद्योग आणि पोलाद राज्यमंत्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2042325)
Visitor Counter : 77