आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ॲनिमियामुक्त भारत – सविस्तर माहिती


ॲनिमियाचा सामना करण्यासाठी सरकार विविध योजनांच्या माध्यमातून पोषणघटकयुक्त तांदूळ अभियानाअंतर्गत लोह, फॉलिक आम्ल आणि विटामिन बी12 युक्त तांदूळाचा टप्प्याटप्प्याने करत आहे पुरवठा

Posted On: 06 AUG 2024 5:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2024

लहान मुले, पौगंडावस्थेतील मुले आणि महिलांमध्ये ॲनिमियाचे म्हणजेच रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकार ॲनिमिया मुक्त भारत (एएमबी) धोरणाची अंमलबजावणी करत आहे. या 6X6X6 जीवनचक्र धोरणाचे उद्दीष्ट सहा वयोगटातींल लाभार्थींमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्याचे असून ते वयोगट म्हणजे 6-59 महिन्यांची मुले, 5-9 वर्षांची मुले, 10-19 वर्षे वयोगट, प्रजननक्षम वयोगटातील (15-49 वर्षे) महिला, गरोदर महिला आणि स्तनदा माता या सहा गटांमध्ये सहा उपाययोजना सरकार करत आहे.

पोषण अभियान 2.0 हा भारत सरकारचा महत्त्वाचा कार्यक्रम असून कुपोषणाच्या आव्हानावर मात करून सुधारित आरोग्य आणि रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी लोकसमुदायांना सहभागी करून घेण्याचा याचा उद्देश आहे. त्यामध्ये अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचणे, आरोग्यदायी सवयींचा पुरस्कार व त्यासाठी वागणुकीत बदल घडवून घेण्याचे या अभियानाचे उद्दीष्ट आहे.मातांचे पोषण, नवजात शिशु व लहान मुलांसाठी आहाराचे नियम, गंभीर तीव्र कुपोषण/ मध्यम तीव्र कुपोषण आणि आयुष पद्धतींमार्फत उत्तम आरोग्यप्राप्ती याद्वारे कमी वजन, खुरटलेली वाढ आणि रक्तक्षयाचा प्रभाव कमी करणे या बाबी पोषण अभियानाच्या केंद्रस्थानी आहेत.6 महिने ते 6 वर्षे वयोगटातील मुले, गरोदर व स्तनदा माता  व पौगंडावस्थेतील मुली (आकांक्षी जिल्हे आणि ईशान्येकडील राज्यांमधील 14-18 वर्षे वयोगटातील मुली) यांची पोषणाची गरज पूर्ण करण्यासाठी पूरक अन्नाचा पुरवठा केला जाणार आहे.सप्टेंबर व मार्च-एप्रिल महिन्यांत अनुक्रमे पोषण मास आणि पोषण पंधरवडे साजरा केले जाणार आहेत. या काळात रक्तक्षयाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाईल.

रक्तक्षयावर मात करण्यासाठी, लोह, फॉलिक आम्ल आणि विटामिन बी12 ने युक्त फोर्टिफाईड राईस अर्थात पोषणघटकयुक्त तांदुळाचा  पुरवठा सरकारतर्फे केला जात आहे. हा तांदूळ  सरकारच्या लक्ष्यित सार्वजनिक वितरण प्रणाली  (टीडीपीएस), प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण (पीएम-पोषण) योजना, एकात्मिक बाल विकास सेवा (आयसीडीएस) योजना आणि इतर कल्याणकारी योजना (ओडब्ल्यूएस) मार्फत टप्प्याटप्प्याने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुरवला जात  आहे. नेहमीच्या गिरणीतून आलेल्या तांदळाऐवजी सरकारच्या प्रत्येक योजनेत पोषणघटकयुक्त तांदळाचा पुरवठा केला जाणार आहे.

लाभार्थ्यांमध्ये लोह, फॉलिक आम्लाच्या प्रमाणाधारे एएमबीच्या प्रगतीचे मूल्यमापन केले जात आहे.

Annexure

State-wise Iron Folic Acid (IFA) coverage among women across the country

 (Source: HMIS 2023-24)

States/
Union Territories

Percentage of Pregnant women provided 180 IFA Red tablets

Percentage of Lactating women provided 180 IFA Red tablets

India

95.0

65.9

A & N Islands

61.9

77.5

Andhra Pradesh

95.0

86.1

Arunachal Pradesh

91.5

57.4

Assam

95.0

65.4

Bihar

90.8

51.4

Chandigarh

95.0

95.0

Chhattisgarh

95.0

79.8

D&DH and D&D

95.0

95.0

Delhi

95.0

62.6

Goa

95.0

80.6

Gujarat

95.0

95.0

Haryana

95.0

59.7

Himachal Pradesh

89.7

72.1

Jammu & Kashmir

95.0

73.2

Jharkhand

92.4

76.2

Karnataka

95.0

88.3

Kerala

95.0

61.8

Ladakh

95.0

79.8

Lakshadweep

95.0

79.1

Madhya Pradesh

95.0

65.5

Maharashtra

95.0

61.9

Manipur

46.4

33.6

Meghalaya

68.6

64.2

Mizoram

81.5

64.6

Nagaland

71.7

42.4

Odisha

95.0

81.1

Puducherry

95.0

95.0

Punjab

72.8

49.4

Rajasthan

95.0

79.7

Sikkim

93.4

89.3

Tamil Nadu

95.0

61.9

Telangana

95.0

78.3

Tripura

95.0

58.6

Uttar Pradesh

95.0

46.8

Uttarakhand

95.0

64.6

West Bengal

95.0

92.3

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया सिंह पटेल यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

N.Chitale/R.Bedekar/P.Malandkar

 


(Release ID: 2042230) Visitor Counter : 108