पर्यटन मंत्रालय
जानेवारी ते मे 2024 या कालावधीत परदेशी पर्यटकांच्या आगमनात 9.1% वाढ
याच कालावधीत परकीय चलनातील उत्पन्नाने नोंदवली 22.52% वाढ
Posted On:
05 AUG 2024 6:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2024
पर्यटन मंत्रालयाने मे महिन्यातील पर्यटनाची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यातील महत्त्वपूर्ण बाबी पुढीलप्रमाणे:
- मे 2024 मध्ये देशात 6.00 लाख परदेशी पर्यटकांचे आगमन झाले. मे 2023 मध्ये ही संख्या 5.98 लाख इतकी होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ही संख्या 0.3% वाढली आहे.
- जानेवारी ते मे 2024 या कालावधीत 40.72 लाख परदेशी पर्यटकांचे आगमन झाले. जानेवारी ते मे 2023 मध्ये ही संख्या 37.32 लाख इतकी होती. 2023 च्या तुलनेत यंदा 9.1% वाढ झाली आहे.
- मे 2024 मध्ये 17,762 कोटी रुपये इतके परकीय चलनाद्वारे उत्पन्न प्राप्त झाले. मे 2023 मधील 17,206 कोटी रुपये उत्पन्नाच्या तुलनेत यंदा त्यात 3.23% वाढ झाली आहे.
- जानेवारी ते मे 2024 या कालावधीत परदेशी चलन उत्पन्न 1,08,362 कोटी रुपये झाले. जानेवारी ते मे 2023 या कालावधीतील 88,441 कोटी रुपये उत्पन्नाच्या तुलनेत यंदा 22.52% वाढ झाली आहे.
आकडेवारीतील हे कल एकूण आर्थिक वाढ आणि देशातील पर्यटन क्षेत्राच्या विकासावरील सकारात्मक प्रभाव अधोरेखित करतात. परदेशी पर्यटकांचे आगमन आणि परकीय चलन उत्पन्नातील वाढ पर्यटन व्यवसायाची भक्कम स्थिती व या उद्योगाचा विस्तार दर्शवते.
केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
N.Chitale/R.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2041825)
Visitor Counter : 91