विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन संस्था (सीएसआयआर) आणि राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा (एनपीएल) यांच्या सहयोगाने एक आठवडा एक संकल्पना या उपक्रमांतर्गत  एरोस्पेस, इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन आणि धोरणात्मक क्षेत्र (एईआयएसएस) संकल्पनेवर आधारित तीनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

Posted On: 03 AUG 2024 10:09AM by PIB Mumbai

 

वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन संस्था (सीएसआयआर) आणि राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा (एनपीएल) यांच्या सहयोगाने एईआयएसएस या संकल्पनेवर आधारित कार्यशाळा आयोजित केली आहे. ही कार्यशाळा 2 ऑगस्ट ते 4 ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा म्हणजेच एनपीएलच्या प्रांगणात होत असून ती 'एक आठवडा एक संकल्पना' या उपक्रमाचा भाग आहे आणि त्यात सीएसआयआर-सीएसआयओ, सीएसआयआर-सीईईआरआय, आणि सीएसआयआर-आयआयपी या प्रयोगशाळा सहभागी असतील.

वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन संस्था-राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा (सीएसआयआर-एनपीएल) प्रोफेसर वेणू गोपाळ अचंत यांनी या कार्यशाळेत भाग घेणाऱ्यांचे स्वागत केले. त्याचबरोबर सीएसआय-एनएएल आणि एईआयएसएस संकल्पना संचालक डॉक्टर अभय अनंत पाशिलकर यांनी मुख्य भाषण केले. त्यांनी एईआयएसएस ही संकल्पना उलगडून सांगितली तसेच आत्मनिर्भर भारत, स्वस्थ भारत आणि मेक इन इंडिया प्रत्यक्षात आणण्यात असलेली या संकल्पनेची मुख्य भूमिका विशद केली.

सीएसआयआर-सीईईआरआयचे संचालक डॉक्टर पी.सी. पंचरिया यांनी औद्योगिक विकासाला चालना देण्यात असलेली एईआयएसएस संकल्पनेची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. तंत्रज्ञान सहज आणि थेटपणे पोहोचवण्यात एक-खिडकी व्यवस्थेचे असलेले महत्त्वही त्यांनी सविस्तरपणे सांगितले.

कार्यशाळेचे संयोजक डॉक्टर एसके दुबे यांनी तिन्ही दिवसांचा कार्यक्रम मांडला. यामध्ये विद्यार्थी आणि वैज्ञानिक यांच्यामधील संवाद सत्र, स्टार्ट अप्स, सूक्ष्म लघु आणि मध्यम, उद्यमव्यवसाय यांच्या भेटी तसेच स्त्री-केंद्री एईआयएसएस संकल्पना यांचा अंतर्भाव आहे. त्यांनी आभार प्रदर्शन सुद्धा केले. विद्यार्थी आणि वैज्ञानिक यांच्यामधील संवाद-सत्रात 60हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्यांनी प्रदर्शनाचा आनंद घेत वैज्ञानिकांबरोबर संवादही साधला. उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी प्रदर्शनावर आधारित विज्ञान स्पर्धेने पहिला दिवसाची सांगता झाली.

या उपक्रमाची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे:

पहिला दिवस : उद्घाटनाचा कार्यक्रम त्यानंतर अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या क्षेत्रात झालेली संशोधने हे दर्शवणारे प्रदर्शन जिज्ञासा कार्यक्रमाचा भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांना प्रदर्शनास भेट देण्यासाठी आमंत्रण दिले होते त्यातून त्यांची भावी प्रगती विषयी जाणीव वृद्धी होईल तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये त्यांच्या आवडीला प्रोत्साहन मिळेल असा उद्देश होता. अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित उत्पादनांची प्रात्यक्षिकांवर एनपीएल संग्रहालयात असलेल्या प्रदर्शनाचा मुख्य भर होता.

दुसरा दिवस : उद्योगांमधील सहकार्य, सीएसआयआरने विकसित केलेल्या आणि उद्योगांना विक्री केलेल्या तंत्रज्ञानावर भर, पॅनल चर्चेत उद्योगांना त्यांचे तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यास व्यासपीठ मिळेल तसेच मुख्य तज्ञांशी संवाद साधता येईल. प्रख्यात वैज्ञानिकांशी अनेक चर्चा  हे देखील या दिवसाचे वैशिष्ट्य असेल. या चर्चांमधून त्यांच्या कामाचे महत्त्व कळेल तसेच नवीन संशोधन आणि तंत्रज्ञान याबाबत माहिती मिळेल. सहयोग आणि ज्ञान यांच्या शेअरिंगला वाव देण्यासाठी नेटवर्किंग सत्रे असतील

तिसरा दिवस : एईआयएसएस उपक्रमातील सेलिब्रेटिंग वुमन हा भाग, प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचा सहयोग बरोबरीचा असतो याची जाणीव करून देईल. विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात महिलांचे यश या उपक्रमात महिला वैज्ञानिकांनी केलेले नवीन आणि स्वारस्यपूर्ण संशोधन याबद्दलची भाषणे होतील. तंत्रज्ञान विकासाच्या क्षेत्रात आपले कार्यक्षेत्र शोधण्यासाठी युवतींना प्रेरणा मिळावी हा या सत्रांमागचा उद्देश आहे. भविष्यकालीन ट्रेंड तसेच महत्त्वाचे विषय यावर या भाषणांचा भर असेल.

***

H.Akude/V.Sahajrao/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2041088) Visitor Counter : 60