नागरी उड्डाण मंत्रालय
भारतात एकूण 56 बोईंग 737 मॅक्स विमाने नोंदणीकृत आणि कार्यरत
Posted On:
01 AUG 2024 9:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2024
भारतात कार्यरत एकूण 737 मॅक्स विमानांची विमानकंपन्यांनुसार संख्या पुढीलप्रमाणे :
क्र. विमानकंपनीचे नाव भारतात कार्यरत बोईंग 737मॅक्स विमानांची एकूण
1. एअर इंडिया एक्सप्रेस 25;
2. स्पाईस जेट लिमिटेड 07;
3. एसएनव्ही एव्हिएशन प्रा. लि. 24;
(Akasa Air);
बोईंग 737 मॅक्स विमानाचे इंजिन अलीकडे बंद पडल्याची कुठलीही तक्रार संबंधित भारतीय परिचालकांनी केलेली नाही.
भारतात नोंदणीकृत आणि कार्यरत असलेल्या एकूण 56 बोईंग 737 मॅक्स विमानांपैकी, मे. स्पाईस जेटच्या बी 737 मॅक्स विमानावर मे 2024 मध्ये एक घटना घडली होती. इंजिन क्रमांक 2 ऑइल फिल्टर बायपास लाइट जळला होता. खबरदारीचा उपाय म्हणून वैमानिकाने एकेरी इंजिनवर सुखरूप विमान उतरवले होते. विमान कर्मचारी आणि प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार विमान उतरवताना कोणताही त्रास झाला नाही.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय विविध तपासण्या, परीक्षण(नियोजित/अचानक), स्पॉट चेक, रात्र देखरेख इत्यादींच्या यंत्रणेद्वारे प्रवासी आणि विमानाच्या सुरक्षिततेची खात्री करते.जर काही गंभीर त्रुटी / गैर-अनुपालन आढळले तर संचालनालय संस्था/कर्मचारी यांच्याविरुद्ध कारवाई करते. ईपीपीएम(अंमलबजावणी धोरण आणि प्रक्रिया नियमावली) मध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार कारवाई केली जाते ज्यामध्ये आर्थिक दंड आकारण्यासह निलंबन,रद्द करणे समाविष्ट आहे.
सुरुवातीला दिलेल्या मंजुरीनुरूप विमानकंपन्या आणि देखभाल कंपन्या देखरेख, स्पॉट चेक, रात्र देखरेख पद्धतीद्वारे नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आवश्यक अनुपालन कायम ठेवत असल्याची सुनिश्चिती करते.अनुपालनाचा अभाव आढळल्यास विमानकंपन्या/देखभाल कंपन्या आवश्यक सुधारात्मक कृती करतील,याची सुनिश्चिती महासंचालनालय करते.
ही माहिती नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
S.Kane/S.Kakade/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2040509)
Visitor Counter : 76