पर्यटन मंत्रालय
पर्यटन मंत्रालयाकडून पर्यावरणस्नेही व शाश्वत पर्यटनासाठी राष्ट्रीय धोरणांची निर्मिती
Posted On:
01 AUG 2024 6:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2024
पर्यटन मंत्रालय भारताच्या साकल्यवादी प्रतिमेचा विविध उपक्रमांद्वारे प्रचार करत आहे.त्याचाच भाग म्हणून पर्यावरणस्नेही व शाश्वत पर्यटनाचा समावेश या उपक्रमांमध्ये करण्यात आला आहे.
देशात पर्यावरणस्नेही व शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने त्यासाठी राष्ट्रीय धोरणांची निर्मिती केली असून ‘ट्रॅव्हल फॉर लाईफ’कार्यक्रमाला सुरुवात केली आहे.यामुळे पर्यटक आणि पर्यटन व्यवसायिकांना पर्यावरणस्नेही पर्यायांचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे.
पर्यटन हा प्रामुख्याने राज्य शासनाच्या अखत्यारितील विषय आहे.मात्र,पर्यटन मंत्रालय राज्य सरकारे,केंद्रशासित प्रदेश व केंद्रीय विभागांना देशात विविध योजनांतर्गत पर्यटनाशी संबंधित सुविधांच्या उभारणीसाठी आर्थिक पाठबळ देत असते.मंत्रालयाने स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत संकल्पनांमध्ये ‘इको सर्किट’संकल्पनेवर आधारित पर्यटनस्थळे निश्चित केली आहेत.
पर्यटन मंत्रालयाच्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून आंध्र प्रदेश, दिल्ली, गोवा, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, हिमालचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, मध्य प्रदेश, ओदिशा, पंजाब, राजस्थान, सिक्कीम आणि उत्तर प्रदेश आदी राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशांनी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पर्यटन पोलिस तैनात केले आहेत.
केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
S.Kane/R.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2040401)
Visitor Counter : 75