सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय अभिलेखागारांच्या नोंदींचे डिजिटाइजेशन

Posted On: 01 AUG 2024 6:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2024


राष्ट्रीय अभिलेखागाराने आपल्या नोंदीच्या 4.5 कोटी पानांच्या डिजिटायझेशनचा पहिला टप्पा गेल्या तीन वर्षात पूर्ण केला आहे. राष्ट्रीय अभिलेखागाराने दोन वर्षांच्या कालावधीत, आपल्या सध्याच्या सर्व नोंदींपैकी  30 कोटी पानांचे  (अंदाजे ) डिजिटायझेशन करण्याचा दुसरा प्रकल्प सन 2024 मध्ये सुरू केला आहे.  

डिजिटाइज्ड स्कॅन केलेले दस्तऐवज अभिलेखासाठी पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅटच्या (पीडीएफ -ए) स्वरूपात आहेत. जॉइंट फोटोग्राफिक एक्स्पर्ट्स ग्रुप (जेपीईजी) आणि टॅग केलेले इमेज फाइल फॉरमॅट (टीआयएफएफ) या स्वरूपात आहेत. पीडीएफ -ए मधील डिजिटाइज्ड दस्तऐवज हॉट क्लाउड स्टोरेजवर केंद्रीकृत पोर्टलवर अपलोड केले जातात आणि  पीडीएफ -ए, जेपीईजी आणि  टीआयएफएफ देखील आर्काइव्हल क्लाउड स्टोरेजवर संग्रहित केले जातात. एक प्रत लिनियर टेप ऑपरेशन (एलटीओ) वर बॅकअप म्हणून संग्रहित केली जाते.

लोकांसाठी सर्व डिजिटाइज्ड दस्तऐवज https://www.abhilekh-patal.in या पोर्टलवर विनामूल्य उपलब्ध आहेत. या पोर्टलवर सध्या वैशिष्ट्यपूर्ण अभ्यागत संख्या 1,87,031 आहे , वेबसाइट हिट्स- 13,86,833, नोंदणीकृत वापरकर्ते- 28,199, संदर्भ मीडिया- 39,81,383, डिजिटाइज्ड नोंदी - 5,92,279, डिजिटलाइज्ड पृष्ठे- 3,38,18,191 आहेत.

पोर्टलसंदर्भात लोकांसाठी शोध आणि पाहण्याचा अनुभव अधिक चांगला ठरावा यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि इतर अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग राष्ट्रीय अभिलेखागार सर्च पोर्टलच्या पुढील आवृत्यांसाठी करेल.

केंद्रीय संस्कृती  आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.


S.Kane/S.Kakade/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2040366)