रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुंबई-अहमदाबाद जलदगती रेल्वे प्रकल्पासाठी 1389.5 हेक्टर जमीन अधिग्रहीत

Posted On: 31 JUL 2024 8:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 जुलै 2024

 

मुंबई-अहमदाबाद जलदगती रेल्वे (एमएएचएसआर) प्रकल्पाचे बांधकाम सुरू असून हा मार्ग गुजरात, महाराष्ट्र आणि केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेलीमधून जात आहे.

एमएएचएसआर प्रकल्पाविषयी:

मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती येथे 12 स्थानकांसह या रेल्वे मार्गाची लांबी 508 किमी आहे. प्रकल्पाची मंजूर किंमत 1,08,000 कोटी रुपये आहे.

प्रकल्पासाठी संपूर्ण जमीन (1389.5 हेक्टर) अधिग्रहीत करण्यात आली आहे. आत्तापर्यंत, पिअर फाउंडेशनचे (प्रस्तंभ तलाधार) 350 किमी, प्रस्तंभ बांधकामाचे 316 किमी, गर्डर कास्टिंगचे 221 किमी आणि गर्डर लॉन्चिंगचे 190 किमी काम पूर्ण झाले आहे. समुद्राखालील बोगद्याचे (अंदाजे 21 किमी) कामही सुरू झाले आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्प हा अतिशय जटिल आणि तंत्रज्ञानाधारीत प्रकल्प आहे. सर्वोच्च पातळीची सुरक्षा आणि संबंधित देखभाल नियमावली लक्षात घेऊन, बुलेट ट्रेन प्रकल्पाची रचना जपानी रेल्वेच्या मदतीने करण्यात आली आहे. भारतीय गरजा आणि हवामान परिस्थितीनुसार ते अनुकूल करण्यात आले आहे. सिव्हिल स्ट्रक्चर्स, ट्रॅक, इलेक्ट्रिकल, सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन आणि ट्रेनचा पुरवठा या सर्व संबंधित कामांच्या पूर्ततेनंतर प्रकल्पाच्या पूर्ण होण्याच्या कालमर्यादा संयुक्तिकपणे निश्चित केल्या जाऊ शकतात.

मुंबई-अहमदाबाद जलदगती रेल्वे प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे नियमितपणे परीक्षण/आढावा घेतला जात आहे. 

ही माहिती केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

 

* * *

N.Chitale/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2039898) Visitor Counter : 60


Read this release in: English , Urdu , Hindi