अणुऊर्जा विभाग

भारतीय अणुऊर्जा प्रकल्पांच्या कार्यान्वयन सुरक्षेत कोणतीही विसंगती नाही

Posted On: 31 JUL 2024 6:31PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 जुलै 2024

 

“अणुऊर्जा प्रकल्पांच्या कार्यान्वयन सुरक्षेत कोणतीही विसंगती नाही. अणुऊर्जा नियामक मंडळाद्वारे परवाना मिळालेल्या उच्च प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून निर्धारित प्रक्रियेनुसार अणुऊर्जा प्रकल्प चालवले जातात.  या प्रक्रियेचे वेळोवेळी पुनरावलोकन केले जाते आणि आवश्यकतेनुसार त्या अद्यतनित केल्या जातात” असे केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत एका अतारांकित प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

नामांकित स्थानिक वैद्यकीय महाविद्यालये या अणुऊर्जा प्रकल्पांच्या परिसरातील नागरी भागात आणि गावात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचे तसेच त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य मूल्यांकन करतात, असेही मंत्र्यांनी स्पष्टपणे नमूद केले. भारतातील एक प्रमुख कर्करोग संशोधन केंद्र असलेले मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटल, हे या डेटाचे विश्लेषण करते. या सर्वसमावेशक अभ्यासांनी निर्णायकपणे हे सिध्द केले आहे की अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये चालणाऱ्या प्रक्रियांचा आसपासच्या नागरिकांवर कोणताही प्रतिकूल परिणाम होत नाही.

देशाची आण्विक क्षमता वाढवण्याच्या कटिबद्धतेवर प्रकाश टाकताना, डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, सध्या एकूण 7,300 मेगावॅट क्षमतेच्या नऊ अणुऊर्जा अणुभट्ट्या बांधकामाधीन आहेत आणि त्याव्यतिरिक्त आणखी बारा अणुभट्ट्यांसाठी नियोजन सुरू आहे. यातून एक मजबूत विस्तार धोरण अधोरेखित होत असल्याचे ते म्हणाले.

 

* * *

N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2039791) Visitor Counter : 35


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu