वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

डीजीएफटीने व्यवसाय सुलभता वाढवण्यासाठी निर्यात प्रोत्साहन भांडवली वस्तू योजना प्रक्रिया केली सुलभ

Posted On: 26 JUL 2024 5:53PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 जुलै 2024

 

परदेशी  व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी ) सरकारी  सूचना क्रमांक 15 दिनांक 25 जुलै 2024  नुसार निर्यात प्रोत्साहन भांडवली वस्तू योजनेत लक्षणीय सुधारणांची घोषणा केली आहे ज्याचा उद्देश प्रक्रिया सुलभ करणे, व्यवहार खर्च कमी करणे आणि निर्यातदारांच्या फायद्यासाठी ऑटोमेशनला प्रोत्साहन देणे हा आहे. हे बदल व्यवसाय-स्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी आणि भारताची उत्पादन स्पर्धात्मकता सुधारण्याप्रति  सरकारच्या वचनबद्धतेला अनुरूप आहेत.

बदलांनुसार, ही योजना आता निर्यातदारांना आयात केलेल्या भांडवली वस्तूंसाठी इन्स्टॉलेशन प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी वाढीव कालावधी प्रदान करेल. या वाढीव कालावधीमुळे व्यवसायांवरील दबाव कमी होईल, ज्यामुळे ते उत्पादन आणि निर्यात बाबींवर अधिक लक्ष केंद्रित करू शकतील.

तसेच निर्यात दायित्व  कालावधी वाढवण्यासाठी एक सुलभ आणि दंड कमी केलेली शुल्क रचना सुरू करण्यात आली आहे. या सुधारणेमुळे मानवी हस्तक्षेप कमी होईल, अनुपालन सुलभ होईल आणि सेवा वितरणाला गती मिळेल.

तसेच, यापुढे निर्यात दायित्वाला मुदतवाढ  आणि निर्यात नियमित करण्यासंबंधी सर्व धोरण शिथिलता समिती निर्णय एकसमान दंड  शुल्क आकारणीसह लागू केले जातील ज्यामुळे प्रणालीद्वारे अंमलबजावणी करणे सोपे होईल.

निर्यातदारांना लाभ :

या सुधारणांमुळे  निर्यातदारांना नियमांचे पालन करणे सोपे होईल , डीजीएफटी आवश्यकता पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ आणि मेहनत कमी होईल . स्वयंचलित नियम-आधारित प्रक्रियांचा विस्तार करून, मानवी हस्तक्षेप कमी करणे, जोखीम कमी करणे आणि व्यापार सुलभीकरणामध्ये एकूण कार्यक्षमता सुधारणे हे डीजीएफटीचे उद्दिष्ट आहे.

आधुनिकीकरण आणि कार्यक्षमतेप्रति वचनबद्ध:

एप्रिल 2023 मध्ये नवीन परराष्ट्र व्यापार धोरणाची घोषणा झाल्यापासून, डीजीएफटी स्वयंचलित नियम-आधारित प्रक्रियांचा विस्तार करण्यासाठी आपल्या प्रणालींचे सक्रियपणे आधुनिकीकरण करत आहे. हे उपक्रम  व्यवसाय-स्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी आणि जागतिक बाजारपेठेत भारताची स्पर्धात्मकता वाढवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले आहेत. डीजीएफटीने मागील काही दिवसांत ऑथोरायझेशन  इश्यू प्रोसेस, ॲड-हॉक नॉर्म्स फिक्सेशन प्रोसेस, ॲडव्हान्स ऑथोरायझेशन, एक्सपोर्ट ऑब्लिगेशन एक्स्टेंशन, ऑटोमॅटिक स्टेटस होल्डर सर्टिफिकेट इश्यू आदी प्रक्रिया  स्वयंचलित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.  येत्या काही महिन्यांत, व्यापार आणि उद्योग सुलभ करण्यासाठी बहुतांश  प्रक्रिया कमीतकमी किंवा कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय प्रणालीनुसार होतील.

सुधारणांबाबत अधिक माहितीसाठी कृपया डीजीएफटी संकेतस्थळाला  https://www.dgft.gov.in  भेट द्या

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2037639) Visitor Counter : 40