संरक्षण मंत्रालय

लष्करी आणि लष्करी तांत्रिक सहकार्यावरील भारत-रशियन आंतरसरकारी आयोगाच्या कार्यकारी उपसमूहाची तिसरी बैठक नवी दिल्ली येथे संपन्न

Posted On: 24 JUL 2024 6:16PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 जुलै 2024

 

लष्करी आणि लष्करी तांत्रिक सहकार्यावरील भारत-रशियन आंतरसरकारी आयोगाची लष्करी सहकार्याच्या नियोजनावरील कार्यकारी उपसमूहाची तिसरी बैठक 23-24 जुलै, 2024 रोजी नवी दिल्ली येथे झाली. विद्यमान द्विपक्षीय संरक्षण सहकार्य व्यवस्थेच्या कक्षेतील नवीन उपक्रमांवर विचार करून, दोन्ही देशांमधील सध्याचे  संरक्षण संबंध मजबूत करण्यावर चर्चेचा भर राहिला.

कार्यकारी उपसमूहाची बैठक हा भारताचे इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ मुख्यालय आणि रशियाचे आंतरराष्ट्रीय लष्करी सहकार्याचे मुख्य संचालनालय यांच्यात परिचालन स्तरावरील नियमित चर्चेद्वारे उभय देशांमधील संरक्षण सहकार्य पुढे नेण्यासाठी स्थापन केलेला एक मंच आहे.

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2036482) Visitor Counter : 8


Read this release in: English , Urdu , Hindi