सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पुण्यात उद्या VAMNICOM च्या पीजीडीएम- एबीएम कार्यक्रमाच्या 30 व्या तुकडीच्या वार्षिक दीक्षांत समारंभात केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ प्रमुख पाहुणे म्हणून राहणार उपस्थित


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली, सहकार मंत्रालयाचे उपक्रम आणि पाठिंब्याने सहकार क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंट सुलभ करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे

VAMNICOM ने पदवी मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आधीच 100% प्लेसमेंटची घोषणा केली आहे

सहकार मंत्रालयाच्या "सहकार से समृद्धी" या संकल्पनेनुसार सहकार क्षेत्रातील तरुणांना व्यावसायिकदृष्ट्या सक्षम बनवण्यात VAMNICOM चा शिक्षण कार्यक्रम महत्त्वाची भूमिका बजावत आहे

प्रविष्टि तिथि: 19 JUL 2024 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जुलै 2024

केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री  मुरलीधर मोहोळ पुण्यात शनिवार, 20 जुलै 2024 रोजी वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था (VAMNICOM) च्या पीजी डिप्लोमा इन मॅनेजमेंट-एग्री बिझनेस मॅनेजमेंट (PGDM-ABM) च्या 30 व्या तुकडीच्या वार्षिक दीक्षांत समारंभात  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.दीक्षांत समारंभात 14 राज्यांमधील 39 विद्यापीठांमधील 9 विविध कृषी आणि कृषी-संलग्न शाखेतील 90 हून अधिक विद्यार्थ्यांना पीजी डिप्लोमा इन मॅनेजमेंट -ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट पदवी प्रदान करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांमध्ये 30 हून अधिक मुलींचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार मंत्रालयाचे उपक्रम आणि पाठिंबा सहकार क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी आघाडीच्या सहकारी संस्थांमध्ये प्लेसमेंट सुविधा प्रदान करण्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे. सहकार मंत्रालयाच्या "सहकार से समृद्धी" या संकल्पनेच्या अनुषंगाने सहकार क्षेत्रातील तरुणांना व्यावसायिकदृष्ट्या सक्षम बनवण्यात VAMNICOM चा शैक्षणिक कार्यक्रम महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

VAMNICOM ने  पदवी मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आधीच 100% प्लेसमेंटची घोषणा केली आहे. संस्थेतील पदव्युत्तर  विद्यार्थी कृषी व्यवसाय आणि सहकारी क्षेत्रात अग्रणी  भूमिका बजावण्यासाठी व्यवस्थापकीय ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करतात. या विद्यार्थ्यांचे वार्षिक पॅकेज सरासरी 9. 12 लाख रुपये आहे. विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्यांनी विद्यार्थ्यांना प्लेसमेंट प्रस्ताव दिला होता. यामध्ये अमूल, इफ्को, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (NAFED), भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ लिमिटेड (NCCF), कमॉडिटीज मध्ये आर्चर डॅनियल्स मिडलँड कंपनी (ADM) आणि लुईस ड्रेफस कंपनी (LDC), बँकिंगमध्ये आयसीआयसीआय  बँक लिमिटेड, आयडीबीआय बँक लिमिटेड , आरबीएल  बँक लिमिटेड ,  मायक्रो-फायनान्समध्ये नवधन कॅपिटल, सुमितोमो मित्सुई फायनान्शियल ग्रुप , सर्व ग्राम फिनकेअर, ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक, बीएफआयएल  आणि इनपुट क्षेत्रातील टाटा रॅलीज , डीसीएम  श्रीराम, धनुका, दीपक फर्टिलायझर्स यांचा समावेश आहे.

वैकुंठ मेहता वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेत   दोन वर्षांचा पूर्णवेळ निवासी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट - ॲग्रीबिझनेस मॅनेजमेंट (PGDM-ABM) कार्यक्रम उपलब्ध आहे. PGDM-ABM कार्यक्रम नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडेशन, नवी दिल्ली ने  मान्यता दिली आहे.अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद  (AICTE), नवी दिल्ली आणि भारतीय विद्यापीठ संघटनेने एमबीए पदवीच्या समकक्ष म्हणून मान्यता दिली आहे.

 
N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2034531) आगंतुक पटल : 102
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil