विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रामन संशोधन संस्थेच्या उप कंपनीने तयार केलेले ट्यूनेबल लेझर्स क्वांटम ऑप्टिक्स लॅब्सच्या किमती कमी करू शकतील

प्रविष्टि तिथि: 19 JUL 2024 11:16AM by PIB Mumbai

भारताकडे लवकरच स्वतःचे असे मल्टी-चॅनेल, ट्यूनेबल लेझर यंत्रणा तंत्रज्ञान मंच असतील. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था असलेल्या रामन संशोधन संस्थेच्या (आरआरआय) उपकंपनीद्वारे निर्मित हे मंच क्वांटम ऑप्टिक्स लॅबोरॅटरीजसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. स्वदेशी पद्धतीने निर्मित असे मंच  क्वांटम ऑप्टिक्स लॅब्सच्या किमती कमी करू शकतील आणि वैद्यकीय, दूरस्थ संवेदन, जिओ मॅपिंग तसेच अंतराळ अशा विविध क्षेत्रांसाठी त्यांचा वापर होऊ शकेल.
कोणत्याही क्वांटम ऑप्टिक्स लॅबोरॅटरीजच्या केंद्रस्थानी त्यातील अत्युच्च अचूकता असलेल्या लेसर यंत्रणा असतात. मात्र या यंत्रणांच्या अवाजवी किंमती अत्याधुनिक संशोधन तसेच क्वांटम तंत्रज्ञानावर आधारित औद्योगिक वापर अशा दोन्हींसाठी हानिकारक ठरत आल्या आहेत.   
आरआरआयने क्वांटम एनाबल्ड-तंत्रज्ञान साधनांसाठी तसेच औद्योगिक वापरासाठी आवश्यक असणाऱ्या अचूक लेझर यंत्रणांविषयीचे तंत्रज्ञान विकसित केले असून या संस्थेने नुकताच स्वतःची पहिली जोडकंपनी असलेल्या नेक्सअॅटम रिसर्च अँड इन्स्ट्रुमेन्ट्स या कंपनीला परवाना दिला आहे. ही जोड कंपनी लवकरच मल्टी-चॅनेल, ट्यूनेबल लेझर यंत्रणा तंत्रज्ञान मंचाचे उत्पादन सुरु करेल. आरआरआयने ‘फ्रिक्वेन्सी टयूनेबिलीटी आणि प्रिसिजन कंट्रोल असलेली एकमेव  लेझर यंत्रणा’ म्हणून तात्पुरते भारतीय पेटंट मिळवण्यासाठी अर्ज सादर केला आहे.
गेल्या वर्षी, भारताने 6,000 कोटी रुपये खर्चाचे राष्ट्रीय क्वांटम अभियान (एनक्यूएम) हाती घेतले. भविष्यासाठी क्वांटम-आधारित तंत्रज्ञान साधनांची सुरळीत अंमलबजावणी शक्य करणारी परिसंस्था निर्माण करण्याच्या दिशेने आरआरआय योगदान देत आहे.

***

SushamaK/SanjanaC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2034252) आगंतुक पटल : 118
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Tamil