श्रम आणि रोजगार मंत्रालय
ईपीएफओ अनुपालन प्रक्रिया सुव्यवस्थित केल्याने आस्थापनांद्वारे सवलत परत करण्याच्या प्रमाणात वाढ
27 आस्थापनांनी सूट केली परत, त्यामुळे गेल्या 2 वर्षात ईपीएफओ निधीत सुमारे 1688.82 कोटी रुपये आणि 30,000 कर्मचारी जोडले गेले
Posted On:
14 JUL 2024 8:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जुलै 2024
गेल्या दोन वर्षांत, 27 आस्थापनांनी आपल्याला मिळणारी सूट परत केली, त्यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) अंतर्गत निधीत सुमारे 1688.82 कोटी रुपये तसेच 30,000 कर्मचारी जोडले गेले आहेत.
सुधारित सेवांमुळे, अधिकाधिक आस्थापना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) द्वारे दिलेली सूट परत करत आहेत. या आस्थापना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेल त्यांच्या कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी (PF) थेट व्यवस्थापित करू देण्यास प्राधान्य देत आहेत. यामुळे त्यांना त्यांच्या मुख्य व्यवसाय क्रियाकलापांवर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळते आहे.
जलद दावा निपटारा, परताव्याचे उच्च दर, मजबूत देखरेख आणि व्यस्तता सुलभतेमुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाद्वारे आस्थापना आणि सदस्यांना प्रदान केल्या जाणाऱ्या सेवांमध्ये सातत्याने सुधारणा होत आहेत.
कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ईपीएफ कायद्यांतर्गत सूट दिलेल्या आस्थापनांसाठी अनुपालन प्रक्रिया सुलभ करण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षभरात अनेक पावले उचलली आहेत.
प्रक्रियांचे प्रमाणीकरण करण्याच्या प्रयत्नात, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने, प्रथमच, सवलत दिलेल्या आस्थापनांसाठी संबंधित सर्व प्रक्रियांचा समावेश असलेली विस्तृत मानक कार्यप्रणाली (SOPs) आणि नियमावली प्रकाशित केली आहे. या शिवाय, डिजिटायझेशनच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून, एक नवीन सॉफ्टवेअर आणि पोर्टल लवकरच लाँच केले जाईल ज्यामुळे सवलतींची प्रक्रिया सुलभ होईल.
ज्या आस्थापनांना त्यांच्या कर्मचाऱ्यांचे निर्वाह निधी कॉर्पस व्यवस्थापित करायचे आहे त्यांनी ईपीएफ कायद्याच्या कलम 17 अंतर्गत सूट मिळवणे आवश्यक आहे. हे ईपीएफओ ला त्यांना वैधानिक योगदान न देता स्वतःचा निर्वाह निधी ट्रस्ट व्यवस्थापित करण्याची परवानगी देते. अशा सूट मिळालेल्या आस्थापनांना ईपीएफओ द्वारे सदस्यांना प्रदान केलेल्या लाभांच्या बरोबरीने किमान लाभ प्रदान करणे आणि कायद्यात नमूद केल्यानुसार सवलतीच्या अधिसूचित अटींचे पालन करणे वैधानिकरित्या बंधनकारक आहे.
31 मार्च 2023 पर्यंत, 1002 सूट मिळालेल्या आस्थापना असून 31,20,323 सदस्यांचे 3,52,000 कोटी रुपये व्यवस्थापित करत आहेत.
ईपीएफओ चे त्यांच्या भागधारकांवर वाढते केंद्रित लक्ष, यासोबतच सदस्यांसाठी स्थिर परतावा देणाऱ्या व्यावसायिकरित्या व्यवस्थापित निधी यामुळे सूट परत करण्याच्या प्रवृत्तीला चालना मिळत आहे.
* * *
S.Patil/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2033183)
Visitor Counter : 71