कृषी मंत्रालय

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण व ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी खरीप पेरणीच्या प्रगतीचा घेतला आढावा


केंद्रीय मंत्र्यांनी पावसाची सुरुवात आणि भूजल स्थितीबद्दल समाधान व्यक्त केले

Posted On: 11 JUL 2024 10:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जुलै 2024

 

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण व ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या वर्षी खरीप पेरणी दरम्यान डाळींच्या लागवडीच्या क्षेत्रात झालेल्या वाढीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. आज नवी दिल्लीतील कृषी भवन येथे खरीप पिकांच्या प्रगतीचा आढावा घेताना, केंद्रीय मंत्री यांनी विशेषत: तूर डाळींच्या क्षेत्रात पन्नास टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे नमूद केले. देशासाठी डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता साध्य करणे हे प्राधान्य असल्याचेही त्यांनी सांगितले आणि त्या दिशेने एकत्रित प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन देखील केले. त्याचबरोबर चौहान यांनी पुनरुच्चार केला की, केंद्र सरकार सर्व राज्यांमध्ये 100 टक्के उडीद, तूर आणि मसूर डाळ खरेदीसाठी वचनबद्ध आहे आणि या विषयावर जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन केले,जेणेकरून अधिकाधिक शेतकरी कडधान्य लागवडीसाठी पुढे येतील.

त्याचबरोवर इतर मंत्र्यांना पावसाळ्याच्या सुरुवातीबद्दल, भूजल स्थिती आणि बियाणे व खतांची उपलब्धता याबद्दल माहिती देण्यात आली. शिवाय चौहान यांनी खरीप आणि रब्बी पिकांसाठी वेळेवर खतांची उपलब्धता सुनिश्चित करण्यावर भर दिला. तसेच केंद्रीय खत विभागाला राज्यांच्या मागणीनुसार डीएपी खतांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचा सल्ला देण्यात आला. या बैठकीला कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव संजीव चोप्रा तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, भारतीय हवामान विभाग, केंद्रीय जल आयोग आणि खत विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते.

 

 N.Chitale/G.Deoda/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2032597) Visitor Counter : 24