नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यातील एन एच -166S वरील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते धारगळ दरम्यान 1183 कोटी रुपये खर्चून बांधलेला 6-पदरी प्रवेश-नियंत्रित 7 किमीचा मार्ग राष्ट्राला समर्पित केला


गडकरी यांनी वडगांव ते कर्नाटक सीमा दरम्यान 3500 कोटी रुपये खर्चून 45 किमी.लांबीचा बायपास बांधण्याची केली घोषणा

Posted On: 11 JUL 2024 9:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जुलै 2024

 

गोव्यात आधुनिक रस्ते जोडणी बळकट करत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज गोव्यातील एन एच -166S वरील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते धारगळ पर्यंतचा 6-पदरी प्रवेश-नियंत्रित मार्ग राष्ट्राला समर्पित केला.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाला केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक,राज्यसभा खासदार सदानंद तानवडे, आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

1183 कोटी रुपये खर्चाचा 7 किमीचा हा प्रकल्प, मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाशी कनेक्टिव्हिटी वाढवण्यात  लक्षणीय सुधारणा करून  जलद आणि अडथळे -मुक्त प्रवास सुलभ बनवतो. या रस्ते विकासामुळे पर्यटनाला चालना मिळेल  तसेच  मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी वाढून लॉजिस्टिक खर्च कमी होईल अशी अपेक्षा आहे.

याव्यतिरिक्त, सुरळीत आणि सुरक्षित वाहतूक  सुनिश्चित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे, परिणामी  इंधनाचा वापर आणि प्रवासाच्या वेळेत बचत होईल. त्याचबरोबर , या प्रकल्पामुळे प्रदेशातील एकूणच सामाजिक-आर्थिक वाढीला चालना मिळेल आणि  स्थानिक अर्थव्यवस्थेवर आणि रहिवाशांच्या जीवनमानावर त्याचा सकारात्मक परिणाम होईल.

नितीन गडकरी यांनी गोव्यात वडगांव ते कर्नाटक सीमा दरम्यान 3500 कोटी रुपये खर्चून 45 किमी. लांबीचा बायपास बांधण्याची देखील  घोषणा केली. याशिवाय आम्ही एन एच- 748 च्या पणजी-बेळगांव खंडाचे चौपदरीकरण हाती घेणार आहोत. हा प्रकल्प 52 किमीचा असून त्यासाठी 4000 कोटी रुपये खर्च होईल अशी माहिती त्यांनी दिली.

 


N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai
 

 


(Release ID: 2032585) Visitor Counter : 83