कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
श्रीलंकेच्या सनदी अधिकाऱ्यांच्या क्षमता वृद्धीसाठी भारताचे राष्ट्रीय सुशासन केंद्र आणि श्रीलंकन प्रशासकीय विकास संस्था यांच्यातील सहकार्यपूर्ण भागिदारीविषयी चर्चा करण्यासाठी भारताच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे 5 सदस्यीय शिष्टमंडळ येत्या 7 ते 9 जुलै 2024 कालावधीत श्रीलंकेला भेट देणार
Posted On:
07 JUL 2024 1:45PM by PIB Mumbai
श्रीलंकेच्या सनदी अधिकाऱ्यांच्या क्षमता वृद्धीसाठी भारताच्या राष्ट्रीय सुशासन केंद्राने श्रीलंकन प्रशासकीय विकास संस्था या श्रीलंकेतील संस्थेसोबत सहकार्यपूर्ण भागिदारी केली आहे. श्रीलंकेत कोलंबो इथे येत्या 7 ते 9 जुलै 2024 कालावधीत या भागिदारी उपक्रमाविषयी द्विपक्षीय चर्चांचे आयोजन केले आहे. भारताच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे (DARPG) 5 सदस्यीय शिष्टमंडळ या चर्चांमध्ये सहभागी होणार आहे. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे सचिव तसेच राष्ट्रीय सुशासन केंद्राचे महासंचालक व्ही. श्रीनिवास हे या शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या दिलेल्या निमंत्रणाला प्रतिसाद म्हणून हे शिष्टमंडळ या चर्चेत सहभागी होणार आहे. कार्मिक प्रशासन तसेच शासन - प्रशासनातील परस्पर द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करणे हा या भेटीचा उद्देश असणार आहे.
आपल्या श्रीलंका भेटीत भारतीय शिष्टमंडळ शिष्टाचारानुसार श्रीलंकेचे पंतप्रधान महामहीम दिनेशचंद्र रूपसिंघे गुणवर्धने यांची भेट घेणार आहे. श्रीलंकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या क्षमता वृद्धीसाठीच्या उपक्रम आणि कार्यक्रमांवर चर्चा करणे, तसेच क्षमता वृद्धीसाठीच्या उपक्रमांबाबत संभाव्य दिर्घकालीन करारांकरता सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करणे हा श्रीलंका भेटीवर जात असलेल्या या शिष्टमंडळाचा मुख्य उद्देश असणार आहे. या दरम्यान होणाऱ्या चर्चांमध्ये सुशासनासाठीच्या सर्वोत्तम कार्यपद्धती परस्परांसोबत देवाणघेवाण करण्यासोबतच, भविष्यातील परस्पर सहकार्यासाठीच्या संभाव्य मार्गांची आखणी करण्यावर भर दिला जाणार आहे.
***
S.Kane/T.Pawar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2031412)
Visitor Counter : 70