आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

2024 या वर्षासाठी राष्ट्रीय पदवीपूर्व पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET UG) आणि राष्ट्रीय पदव्युत्तर पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET PG) या दोन्ही परीक्षांच्या अभ्यासक्रमांसाठी समुपदेशन वेळापत्रक अद्याप अधिसूचित केलेले नसल्याचे वैद्यकीय समुपदेशन समितीचे स्पष्टीकरण

Posted On: 06 JUL 2024 8:01PM by PIB Mumbai

 

आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या अखत्यारितील (DGHS) वैद्यकीय समुपदेशन समितीने (MCC) 2024 या वर्षासाठी राष्ट्रीय पदवीपूर्व पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET UG) आणि राष्ट्रीय पदव्युत्तर पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET PG) या दोन्ही परीक्षांच्या अभ्यासक्रमांसाठी समुपदेशन वेळापत्रक अद्याप अधिसूचित केलेले नसल्याचे वैद्यकीय समुपदेशन समितीने (MCC) स्पष्ट केले आहे.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगामार्फत (NMC) परीक्षा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि जागांसाठीची सारणीला अंतिम स्वरुप दिले गेल्यानंतरच, वैद्यकीय समुपदेशन समितीद्वारा (MCC) त्यांच्या संकेतस्थळावर राष्ट्रीय पदवीपूर्व पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET UG) आणि राष्ट्रीय पदव्युत्तर पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET PG) या दोन्ही परीक्षांच्या अभ्यासक्रमांसाठी समुपदेशन वेळापत्रक जाहीर केले जाते. राष्ट्रीय पदवीपूर्व पात्रता सह प्रवेश परीक्षेच्या (NEET UG) अभ्यासक्रमाच्या जागांसाठी सन 2021 साठी 19 जानेवारी 2022 रोजी, सन 2022 मध्ये 11 ऑक्टोबर 2022 रोजी आणि सन 2023 करता 20 जुलै 2023 रोजी समुपदेशनासाठी सुरुवात झाली होती.

सन 2024 या वर्षाकरता  राष्ट्रीय पदवीपूर्व पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET UG) आणि राष्ट्रीय पदव्युत्तर पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET PG) या दोन्ही परीक्षांच्या अभ्यासक्रमांसाठीच्या जागांच्या सारणीला जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात  अंतिम स्वरुप दिले जाण्याच्या प्रक्रियेला सुरूवात होईल असे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगामार्फत (NMC) कळवले गेले होते. म्हणजेच त्यांच्याद्वारे राष्ट्रीय पदवीपूर्व पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET UG) अभ्यासक्रमासाठीच्या जागांच्या सारणीला जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत आणि राष्ट्रीय पदव्युत्तर पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET PG) भ्यासक्रमासाठीच्या जागांच्या सारणीला ऑगस्टच्या मध्यापर्यंत अंतिम स्वरुप दिले जाऊ शकेल असे त्यांनी कळवले आहे. या प्रक्रियेनुसारच वैद्यकीय समुपदेशन समितीद्वारा (MCC) समुपदेशनाचे वेळापत्रक अधिसूचित केले जाणार आहे.

त्यामुळेच या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर असे स्पष्ट केले जात आहे कीवैद्यकीय समुपदेशन समितीद्वारा (MCC) 2024 या वर्षासाठी समुपदेशनाचे वेळापत्रक अद्यापही अधिसूचित करण्यात आलेले नाही.

***

S.Patil/T.Pawar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2031334) Visitor Counter : 35


Read this release in: English , Urdu , Hindi