कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
निवृत्तीवेतन आणि निवृत्तिवेतनधारक कल्याण विभागामार्फत कौटुंबिक निवृत्तीवेतन तक्रारींचे निवारण करण्याच्या विशेष मोहिमेच्या पहिल्या आठवड्यात 1034 प्रकरणांचा निपटारा
Posted On:
05 JUL 2024 5:26PM by PIB Mumbai
निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने केंद्र सरकारच्या कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांच्या जीवनात सुलभता आणण्यासाठी 1-31 जुलै 2024 या कालावधीत कौटुंबिक निवृत्तीवेतन तक्रारींचे निवारण करण्यासाठी महिनाभराची मोहीम सुरू केली आहे. निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याचा भाग असलेली ही मोहीम कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी 1 जुलै 2024 रोजी नवी दिल्ली येथील नॅशनल मीडिया सेंटर येथे सुरू केली.
या विशेष मोहिमेसाठी, मोहिमपूर्व टप्प्यात संरक्षण, रेल्वे, गृह मंत्रालयांतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल इत्यादींसारखी 46 मंत्रालये/विभाग/संस्था यातील निवृत्तिवेतनधारकांच्या 1891 (15.06.2024 रोजी) कौटुंबिक निवृत्तीवेतन संबंधित तक्रारी विचारार्थ घेण्यात आल्या आहेत. संबंधित मंत्रालय/विभाग/संस्था, वेतन लेखा कार्यालये (PAOs), केंद्रीय निवृत्तीवेतन लेखा कार्यालय (CPAO), निवृत्तीवेतन वितरण बँका, निवृत्ती वेतनधारकांच्या कल्याणकारी संघटना इत्यादी सर्व हितधारक या मोहिमेत सहभागी होत आहेत.
हितधारकांच्या समन्वित प्रयत्नामुळे 04 जुलै 2024 पर्यंत 1891 प्रकरणांपैकी 1034 प्रकरणे निकाली काढण्यात आली, त्यामुळे प्रलंबित प्रकरणांची संख्या 857 झाली आहे. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या तीन संस्थांमध्ये माजी सैनिक कल्याण विभाग (356), संरक्षण वित्त विभाग (347) आणि रेल्वे मंत्रालय (66) यांचा समावेश आहे.
***
S.Kakade/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2031069)
Visitor Counter : 78